Fig Farming In India अंजीर शेती लागवड, नियोजन आणि व्यवस्थापन संपूर्ण माहिती.

fig cultivation in India pdf | fig farming profit per acre | fig farming in Maharashtra | where is Anjeer grown in India

fig farming in India (अंजीर शेती) : आजकाल बऱ्याच शेतकऱ्यांचा कल अंजीर शेतीकडे वाढत आहे. अंजीर हे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे फळझाड आहे. अंजीर लागवड, नियोजन, आणि व्यवस्थापन याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत . त्यामुळे तुम्ही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेऊ शकता याची माहिती आज आपण घेणार आहोत. अंजीर हे एक औषधी फळझाड आहे. कमी काळजीमध्ये हे तुम्हाला जास्त नफा मिळवून देते.

Fig Farming In India अंजीर शेती लागवड, नियोजन आणि व्यवस्थापन संपूर्ण माहिती.
Fig Farming In India अंजीर शेती लागवड, नियोजन आणि व्यवस्थापन संपूर्ण माहिती.

त्यामुळे बरेच शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा या फळझाडांची शेती करून खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अंजीर हे कमी पाण्यात येणारे फळझाड आहे. याचप्रमाणे अंजिराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत लोह आणि जीवनसत्‍वे अंजिरात आढळतात. अंजीर हे पित्‍तनाशक व रक्‍तशुध्‍दी करणारे असल्‍यामुळे बाजारात याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. (fig farming in India)

भारतात अंजीर शेती करणारे जिल्हे (where is Anjeer grown in India)

भारतात अंजीर बऱ्याच ठिकाणी पिकवला  जातो. अंजीर पिकवणाऱ्या जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे. 

 • महाराष्ट्र
 • कर्नाटक
 • गुजरात
 • राजस्थान 
 • मध्य प्रदेश
 • तमिळनाडु

या प्रदेशांमध्ये अंजीर जास्त विकसित होतो. महाराष्ट्रात अंजीराची वाढ कोकण व नाशिक जिल्ह्यात सुध्दा केली जाते. (fig farming in Maharashtra).

अंजीर लागवड (fig cultivation in India) :

अंजीर लावण्यासाठी पावसाळ्याच्या आधीचा मोसम चांगला असतो. हेक्टरी अंजिराच्या ४०० झाडांची लागवड करता येते. सातारा ,पुणे , जेजूरी पर्यंतचा (पुरंदर तालुका) दहा ते बारा गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्‍पादनाचे प्रमुख  क्षेत्र आहे. औरंगाबादमधील  दौलताबाद भाग, नाशिक व पूर्ण खानदेश जिल्‍हयात या फळझाडाची थोडीफार लागवड केली जाते. जून , जूलै मध्‍ये पाऊस आल्यावर अंजीराची मुळे फुटलेली रोपे खड्यात लावावी. अंजिराच्या रोपावर भरपूर पाने फुटलेली असल्‍यास फक्‍त  २ ते ४ पाने ठेवावीत. खडयात रोप लावून पाणी द्यावे  नंतर कलम व्यवस्थित फुटेपर्यंत चार-पाच  दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे. (where is anjeer grown in india)

अंजीर पिकासाठी किती पाणीपुरवठा असणे आवश्यक आहे ?

अंजिराचे पीक कमीत कमी पाण्यात येते. फळझाड जसजसे वाढत जाईल तसतसे गरजेप्रमाणे पाणी द्यावे. झाडाला फळ लागल्यानंतर ऑक्‍टोबर ते मे महिन्‍यात नियमित पाणी द्यावे. जूलै आणि ऑगस्‍ट या काळात झाडाला जास्त पाणी देऊ नये. जेव्हा अंजिराचे फळ वाढत असते तेव्हा जास्त प्रमाणात पाणी द्यावे. अंजिराचे फळ वाढत असताना पाणी दिल्यामुळे अंजिराच्या आकारात फरक पडतो. फळांमध्ये कलर येताना झाडाला पाणी कमी प्रमाणात द्यावे त्यामुळे अंजिराच्या फळातील गोडी वाढते जेव्हा अंजीर तोडायचा असेल त्यावेळेस पाणी देऊ नये.(fig farming in india)

अंजिरावर कोणती कीड पडते व त्याचे नियोजन कसे करावे (fig farming in india) ?

 • तांबेरा हा अंजीरावर पडणारा एक रोग आहे त्यामुळे अंजिराची पाने लालसर पडतात. तांबेरा हा रोग बुरशी प्रमाणे आहे तो पावसाळ्यात जास्त प्रमाणात अंजीरावर दिसून येतो.
 • अंजिरावर बुरी हा रोग पण पडतो त्यामुळे बुरी दिसताच योग्य ती औषध फवारणी करावी.

अंजिराच्या कोणकोणत्या सुधारित जाती आहेत ?

अंजिराच्‍या अनेक जाती आहेत. 

 • सिमरना 
 • कालिमिरना
 • कडोटा
 • काबूल
 • मार्सेल्‍स या जाती प्रसिध्‍द आहेत.
 • पुणे भागातील पुना अंजीर नावाने प्रसिध्‍द असलेली जात (ऍड्रिऍटिक ) किंवा कॉमन या प्रकारातील असून महाराष्‍ट्रात मुख्‍यतः हीच जात लावली जाते. (fig farming in india)

अंजिराचे पीक कोणत्या हंगामात घेता येते ?

अंजिराच्या उत्पन्नासाठी उष्ण आणि कोरड्या हवामानाची गरज असते. कमी प्रमाणात तापमानात अंजिराचे  उत्पन्न जास्त मिळत नाही. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा परिसरात ऑक्टोबर ते मार्च महिन्यात अंजिराचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते. 

अंजीर लागवडीसाठी कोणत्या जमिनीची आवश्यकता आहे ?

हलक्या मध्यम तांबड्या आणि काळी जमिनीत अंजिराची लागवड केली जाते. लाल तांबूस आणि काळी जमिनीत अंजीर चांगल्या प्रमाणात येते. काळी मातीची जमीन अंजिराला योग्य आहे. खोलगट आणि निचरा असलेल्या भागात अंजीर व्यवस्थित येऊ शकत नाही. 

अंजीर सुकविणे (dry fig) :

अंजीर कसे सुकवायचे आता आपण पाहणार आहोत. अंजीर सुकवण्यासाठी एका पेटीत तुम्हाला अंजीर ठेवायचे आहेत ज्या पेटीतून तुम्ही अंजिराला सहजपणे बाहेर काढू शकता.अंजीर एका लोखंडी जाळीवर पसरून ठेवायचे आहेत आणि खालून शेगडी चालू करायची आहे. निखाऱ्यात अंजीर वाळवायचे आहेत. अंजीर सुकवण्याआधी गंधकाची पूडी ठेवून ती पेटी बंद करावी. सुकलेल्या अंजिराला एक गोल आकार द्यावा व हे अंजीर मिठाच्या पाण्यात भिजत घालावे व नंतर वाळवून ठेवावे. (fig farming in india)

अंजीर खाण्याचे फायदे (anjeer khanyache fayde in marathi)

 • अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ दूर करणारे फळ आहे.
 • अंजीरामध्ये तंतुमय खुप असतात. अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावष्टंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.
 • अंजीर खाल्ल्यास जखमा लवकर भरून येतात.
 • अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये योग्य काम करते. 
 • अंजीर खाल्ल्याने पित्त दूर होते. 
 • अंजिराच्या नियमित सेवनाने रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होतो. 

अंजीर शेतीत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

१. अंजीर शेती फायदेशीर आहे का? 

उत्तर : एक किलो अंजिराची किंमत: 100 रुपये (अंदाजे). शेतातून मिळणारे उत्पन्न एकूण उत्पन्न x 100 रुपये आहे. (4070 x 100) = 4, 07,000 रु. 

२. महाराष्ट्रात अंजीर कुठे पिकतात? (fig farming in maharashtra)

उत्तर : महाराष्ट्र जास्त भरून सासवड ते पुरंदर परिसरात अंजीराचे उत्पन्न सर्वात जास्त प्रमाणात आढळते. साधारण 2500 हेक्टर क्षेत्र हे अंजिराचे आहे. 

३. एका अंजिराच्या झाडाला एकरी किती उत्पन्न मिळते? (fig farming profit per acre)

उत्तर : एका अंजिराच्या झाडाला एकरी 2.40 लाख प्रति एकर उत्पन्न मिळते. 

४. अंजीर वाढण्यास किती वेळ लागतो?

उत्तर : अंजिराच्या  वाढीसाठी दोन ते तीन वर्षाचा  कालावधी लागतो. 

५. अंजिराचे उत्पन्न वर्षातून किती महिने घेता येते?

उत्तर : अंजिराचे उत्पन्न वर्ष दोन बाराही महिने घेतले जाते. (fig farming in india)

हे पण वाचा : Crop Insurance : एक रुपया मध्ये मिळणार साडेपाच लाख शेतकऱ्यांना पिक विमा

Leave a Comment