पंजाब डख हवामान अंदाज : Panjabrao Dakh यांच्या हवामान अंदाजानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये या भागांमध्ये होणार अतिवृष्टी.

पंजाब डख हवामान अंदाज : Panjabrao Dakh यांच्या हवामान अंदाजानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये या भागांमध्ये होणारा अतिवृष्टी.
पंजाब डख हवामान अंदाज : Panjabrao Dakh यांच्या हवामान अंदाजानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये या भागांमध्ये होणारा अतिवृष्टी.

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस दडी मारून बसलेला होता. गेल्या दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये  परतीच्या पावसाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे.  शेतकरी वर्ग पावसाची वाट पाहत आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते. पण यावर्षी पाऊस लांबणीवर पडला आहे. पावसाळ्याचे दिवस संपत आले तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत.

गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक जणांचे नुकसान झाले तरी यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले जवळपास तीन महिने उलटून गेले तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला नाही.

येत्या 48 तासात हवामान अंदाज

Panjabrao Dakh : परतीचा पाऊस आल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पडणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जून महिना सुरू झाला तसा सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. मात्र जुलै च्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची तीव्रता वाढलेली होती. राज्यातील अनेक भागांमध्ये जुलै च्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती.

ऑगस्ट महिना सुरू झाला तसा पाऊसही महाराष्ट्रात आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळाला.आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने सुरुवात केलेली आहे. या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज today

अनंत चतुर्थी दिवशी पावसाने महाराष्ट्राचे विविध भागांमध्ये दमदार हजेरी लावली आहे.  पुणे आणि चंद्रपूर मध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. मात्र राज्याच्या अनेक भागांमध्ये अजूनही पाऊस पाहायला मिळत नाही. आंबेगावच्या परिसरामध्ये काल ढगफुटी प्रमाणे मुसळधार स्वरूपात पाऊस पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. 

चंद्रपूरच्या अनेक भागात काल पूर आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 

पंजाब डख यांनी पावसाबाबत मोठी अपडेट दिलेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 28 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र मध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार झाल्यामुळे पंजाब डख यांनी मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. 

पंजाब डख हवामान अंदाज ऑक्टोबर 2023

28 ऑक्टोबर पासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.

Panjabrao Dakh यांनी सांगितल्याप्रमाणे 3 ऑक्टोबर रोजी बंगालच्या खाडीत तीव्र चक्रीवादळ तयार होणार आहे. याचा परिणाम ऑक्टोबर मध्ये पडणाऱ्या पावसावर होणार आहे.ऑक्टोबर मधील पाऊस मुसळधार स्वरूपाचा असणार आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्र मध्ये मुसळधार पडणार आहे असा अंदाज हवामान खात्याने देखील दिलेला आहे.

हे पण वाचा : IMD Weather Update : बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी…काय म्हणते भारतीय हवामान विभाग ?

 

 

Leave a Comment