Maharashtra Rain Alert : येत्या काही तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आय एम डी (IMD) कडून या भागांना हाय अलर्ट जारी.

Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : IMD हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या काही तासात पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. या पावसासोबत मोठ्या प्रमाणात वादळी वारे महाराष्ट्र राज्यात धडकणार आहेत. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढलेले आहे. तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. आता नुकत्याच हाती आलेल्या हवामान अंदाजानुसार आयएमडीने Maharashtra Rain Alert पुन्हा एकदा महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी केलेला आहे.

येत्या काही तासात हवामान अंदाज

आय एम डी ने दिलेल्या हाय अलर्ट नुसार आज महाराष्ट्रातील मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

तसेच हवामान विभागाने विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता त्याचबरोबर गारपीट देखील सांगितली आहे.

महाराष्ट्र मध्ये नाशिक, जळगाव, बीड, सातारा, पुणे, संभाजीनगर, अहमदनगर या भागांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

यवतमाळ, सोलापूर, नांदेड, अकोला, अमरावती, जालना तसेच सांगली अशा अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईमध्ये येत्या काही दिवसांमध्ये हवामान हे उष्ण स्वरूपाचे राहील मात्र संध्याकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे.(Mumbai Weather Update)

पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज

पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस हा नुसताच पडणार नाही, तर त्याबरोबर मोठ्या प्रमाणात वादळ वारे वाहणार आहेत. या वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असू शकतो. असा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे. (Maharashtra Rain Alert) त्याचबरोबर या पावसासोबत गारपीठ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment