Tomato Price Today Hike : १० ते १२ रुपये मिळणारे टोमॅटो आज 160 रुपये किलो कसे झाले ?

Tomato Price Today Hike : १० ते १२ रुपये मिळणारे टोमॅटो आज 160 रुपये किलो कसे झाले ?
Tomato Price Today Hike : १० ते १२ रुपये मिळणारे टोमॅटो आज 160 रुपये किलो कसे झाले ?

Tomato Price Today : गेले काही दिवसांपासून आपण पाहत असाल की टोमॅटो भाव गगनाला जाऊन भिडले आहेत. टोमॅटोचे भाव दर प्रति किलोला शंभर ते 120 रुपये किलो आहेत. तर जवळपासच्या बाजारपेठांमध्ये 150 ते 160 रुपये प्रति किलो इतका भाव झालेला आहे. संपूर्ण देशामध्ये टोमॅटोच्या भावाची हीच परिस्थिती आहे. टोमॅटोची किंमत (Tomato Price Today) ही सर्वसामान्य किमतीपेक्षा बाहेर गेल्यामुळे सर्वसामान्य लोकांची चिंता वाढलेली आहे. 

टोमॅटोची किंमत का वाढली ? । Tomato Price Today Hike july 2023

काही दिवसांपूर्वी आपण पाहिले असेल की टोमॅटोला बाजार भाव नसल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेमध्ये आपल्याला टोमॅटो रस्त्यावर पडलेले दिसत होते. पण हेच कवडीमोल विकणारे टोमॅटो आज सर्वसामान्य लोकांच्या खरेदीच्या आवाक्या बाहेर गेलेले आहेत. टोमॅटोची कवडीमोल किमतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या लागवडी आणि उत्पन्नाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे बाजारपेठ्यांमध्ये टोमॅटोची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होती पण त्या मागणीला पूर्ण करण्यासाठी बाजारामध्ये टोमॅटो खूप कमी प्रमाणात असल्यामुळे टोमॅटोची किंमत अचानक खूप वाढली 

आपल्या घराजवळ असणाऱ्या किरकोळ बाजारपेठांमध्ये दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या टोमॅटोची किंमत 160 रुपये किलो इतकी झालेली आहे. ही सर्वसामान्य लोकांच्या खरेदीच्या आवाक्याबाहेर केलेली आहे. त्यामुळे जवळपास सर्व हॉटेल्स आणि जवळपासच्या घरांतून टोमॅटो गायब झालेले आहेत. 

हे पण वाचा : Gold Rate Today Pune : आजचा सोन्याचा भाव पाहून ग्राहक झाले आनंदी !

टोमॅटोची किंमत कधीपर्यंत कमी होईल ? । Tomato Price Today july 2023

सध्या महाराष्ट्र मध्ये टोमॅटोची लागवड खूप कमी प्रमाणात झालेली होती. टोमॅटोच्या मालाला काही दिवसांपूर्वी मिळालेल्या भावामुळे सर्व शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतीकडे दुर्लक्ष केलेले होते. आता टोमॅटोची किंमत सर्वसाधारणपणे ऑगस्ट मध्ये कमी होऊ शकते.ऑगस्ट येईपर्यंत मार्केटमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची टोमॅटो विकण्यासाठी येतील आणि टोमॅटोची किंमत कमी होईल. 

हे पण वाचा : हवामान अंदाज आणि शेतकरी बातम्या रोज पाहण्यासाठी Whatsapp Group ला जॉईन व्हा.  

 

Leave a Comment