Monsoon Update Today 2023 : बिपर जॉय या चक्रीवादळाने जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारा पाऊस दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाला नाही. जून महिना संपला तरीही महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. बिपर जॉय चक्रीवादळाने बाष्पभवन गुजरातकडील भागात वाहून नेले.
जसा जून महिना संपला तास शेवटच्या आठवड्यात पावसाने महाराष्ट्रात चांगली हजेरी लावली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोकणपट्टीत, मराठवाड्यात, विदर्भात काही भागात चांगला पाऊस झाला. तरीही महाराष्ट्रात जून महिना झाला तरी पावसाळ्यावढा पाऊस झालेला नाही.
हे पण वाचा : Gold Rate Today : तुमच्यासाठी आनंदाची बातमी ! सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 3000 रुपयांनी घसरून 57,000 रुपये
महाराष्ट्रात आज कुठे पाऊस पडणार आहे ?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात कोल्हापूर, रायगड, पुणे, तसेच रत्नागिरी, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्यांमध्ये बहुतांश भाग वगळता मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
अंदाजानुसार पुढील काही दिवस कोकण भागात मुसळधार, मराठवाड्यात व विदर्भात बहुतांश भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल.
हे पण वाचा : Rain Update in Maharashtra : मुंबईत मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट !