Rain Update in Maharashtra : मुंबईत मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट !

Mumbai rain update
Mumbai weather update

Mumbai rain update :  बऱ्याच दिवसांपासून सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता पावसाची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कालपासून मुंबईमध्ये सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवार 25 जून रोजी मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे नागपूर आणि इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Mumbai weather today : How many mm of rainfall in Mumbai today?)

पहिल्याच पावसात मुंबईत झाली लोकांची अव्यवस्था 

बिपर जॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबीवर पडला होता पण आता पाऊस पडण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार  झाले आहे. मुंबई नागपूर तसेच अनेक भागांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  हा पाऊस शनिवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहे. 

जून महिन्यामध्ये सुरुवातीला दोन ते तीन आठवडे मुंबईमध्ये पाऊस झाला नाही नंतर मुंबई ठाणे आणि इतर भागात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. दिवसभर पावसाचा जोर चालूच होता. मुंबई महानगरपालिका कडून पावसाचा करण्यात आलेले दावा फोल ठरला. मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडी  झाली व वाहनांची दुरावस्था झाली. साधारणतः 115 पण आठ एमएम इतका पाऊस मुंबईमध्ये शनिवारी झाला. 

हे वाचा : IMD या पाच जिल्ह्यात होणार आज पासून मुसळधार पाऊस

हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी 

शनिवारपासून पडणाऱ्या पावसामुळे हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा गेल्या दोन दिवसापासून वाढत चालला आहे व हा पाऊस पुढील चार ते पाच दिवस असाच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  

Mumbai Rains : मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी पुढचे ४८ तास खूप महत्त्वाचे

 

Leave a Comment