Panjab Dakh Havaman Andaj july : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडला. तरी अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये होतो तसा पाऊस झालेला नाही. पंजाब डख यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात पुढील दोन दिवसात अनेक भागात पाऊस जोर धरणार आहे.
पुढील दोन दिवसात कुठे पाऊस पडणार ? Panjab Dakh Havaman Andaj july :
मुंबई आणि जवळपासच्या भागात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या होत्या पण पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे 25 जून पासून महाराष्ट्रमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली.
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार 15 जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार आहे. तसेच ४ जुलै ते ८ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाडा, पश्चिम पूर्व विदर्भात भाग वगळता इतर भागात मुसळधार पाऊस होणार आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे.
शेतकऱ्यांनी पेरण्या कधी करायच्या ?
पंजाब डख यांनी सांगितल्या प्रमाणे शेतकरी मित्रांना घाबरण्याची गरज नाही. पाऊस हा 15 जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे 15 जुलै पर्यंत शेतकरी पेरणी करू शकतात.
हे पण वाचा : Monsoon Update Today 2023 : 8 जुलै रोजी या 6 जिल्ह्यात मुसळधार पाऊस