Monsoon Update 9 july 2023 : महाराष्ट्रात अनेक राज्यात मुसळधार पाऊस झाला. पण बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा तयार न झाल्याने काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत.
राज्यातील हवामान विभागने कोकणात रेड अलर्ट जारी केलेला आहे. गेले काही दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. तरीही अजूनही पावसाचा जोर कोकणामध्ये कमी झालेला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येथे २४ तासांमध्ये कोकणात आणखी मुसळधार पाऊस होईल.
जुलै महिना सुरू झाला तसा पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या. सिंधुदुर्गमध्ये अजूनही इतका पाऊस झालेला नाही. तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस खूप कमी प्रमाणात पडला आहे.
पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज । Monsoon Update 9 july 2023
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात ८ जुलै ते 13 जुलै पर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आज जुलैपासून ते 13 जुलै पर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
Monsoon Update 9 july 2023 महाराष्ट्रात जुलै पासून 23 जुलै पर्यंत बहुतांशी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिला जात आहे. तसेच 21 जुलै ते 27 जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू शकतो आणि जिल्ह्याच्या उर्वरित आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असू शकते.
हे पण वाचा : IMD Rain Alert येत्या 24 तासांमध्ये या भागात पडणार मुसळधार पाऊस