IMD Rain Alert : हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर पश्चिम बंगाल, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. असा अंदाज (Weather updated) वर्तवण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) महाराष्ट्रात दमदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी उष्णता (Heat Wave) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या वातावरणामुळे देशातील हवामान झपाट्याने बदलत आहे.अनेक लोक आजारी पडत आहेत. भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जाहीर केलेला आहे. महाराष्ट्रातही बऱ्याच भागात आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
ऊन सावलीचा खेळ कधी थांबणार ?
येत्या 24 तासात पाऊस तर पुढील 24 तासात ऊन अशा प्रकारे ऊन सावलीचा खेळ हा महाराष्ट्र मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हिमालयामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही वेळेस हिमवृष्टी आणि मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. असा अंदाज आयएमडीने (IMD Rain Alert) दिलेला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशाच्या परिसरामध्ये वादळी वारे आणि गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
उद्याचे हवामान
या भागांमध्ये पावसाची शक्यता :
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार बिहार, झारखंड, मराठवाडा, पश्चिम बंगाल, विदर्भ या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि गारपीट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच आसाम, सिक्कीम,तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये मेगर्जनीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, असा अंदाज आयएमडीने (IMD rain alert)दिलेला आहे.
मुंबईमध्ये आज पाऊस पडेल का ?
आज महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, ठाणे, मुंबई, धुळे, परभणी, जालना, हिंगोली, सिंधुदुर्ग, रायगड या भागात देखील पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने नाशिक, पुणे, जळगाव, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सांगली या जिल्ह्यांना देखील पावसाचा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे (IMD Rain Alert)