Weather Update : पुढील 48 तासात हवामान अंदाज.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाचे वातावरण (Weather Update) तयार झालेले होते. बऱ्याच भागात पावसाने ढगांच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, पण सध्या महाराष्ट्र मध्ये हे अवकाळी पावसाचे (Weather Update) वातावरण निवळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा वाढलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील दक्षिण भागात पावसाचे वातावरण अजून कायम आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज (Weather Update)
येत्या 48 तासात हवामान अंदाज हा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा राहील. सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांसह लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. असे आय एम डी (IMD) ने म्हटलेले आहे.
या भागामध्ये घेतली पावसाने विश्रांती(Weather Update 19 & 20 April)
आज मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे वातावरण निवळलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. पुढील 19 आणि 20 Weather Update) मध्ये उन्हाची तीव्रता वाढून विदर्भामध्ये तापमानात वाढ होणार आहे.
पाऊस कधी पडणार आहे 2024 (Weather Update)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील भागात वायव्य विभागातून एक चक्रीय वाऱ्यांची झोक महाराष्ट्र मध्ये वाहत आहे. त्यामुळे पुढील 48 तासांमध्ये मुख्यतः जम्मू कश्मीर, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. याशिवाय भारताच्या ईशान्य भागाकडील प्रदेशात पावसाचा अंदाज दिलेला आहे.
Weather Update : राज्यात काही भागांमध्ये उष्णतेचा हाय अलर्ट तर काही भागात अवकाळी पाऊस.