punjab dakh havaman andaj : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देशात मान्सूनचे आगमन कधी होणार म्हणजेच पावसाला सुरुवात कधी होणार याबद्दल माहिती दिलेली आहे. ती आपण जाणून घेणार आहोत. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात आपल्याला तापमानामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर अनेक भागामध्ये आपल्याला पाऊस कमी पडल्यामुळे पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार याबद्दलची माहिती दिलेली आहे.
आज पाऊस पडेल का महाराष्ट्र । punjab dakh havaman andaj
काही दिवसापूर्वी पंजाबराव डख यांनी मान्सूनसाठी आपला अंदाज जाहीर केलेला आहे. यामध्ये मान्सून 2024 यामध्ये पावसाळ्यात पाऊस समाधानकारक राहणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. पंजाबराव डख यांच्या मते ज्यावर्षी पावसाळ्यात पाऊस जास्त राहतो त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळतो. यंदा मात्र आपल्याला उन्हाळ्यात जास्त प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे पंजाबराव डख यांनी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे.
उद्याचे हवामान
पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार 22 मे ला मानसून चे आगमन अंदमानमध्ये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन हे 12 ते 13 जूनच्या आसपास होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये 12 ते 13 जूनच्या आसपास पावसाला सुरुवात होईल,असे पंजाबराव यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करताना सांगितलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 22 जून नंतर पेरणीला सुरुवात करावी असेही पंजाबराव यांनी म्हटलेले आहे.
पंजाब डख हवामान अंदाज today
राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे 7 मे पासून पाऊसासाठी वातावरण तयार होणार आहे. 7 मे ते 11 मे 2024 पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पूर्व मोसमी पाऊस पाहायला मिळू शकतो. पंजाबराव डख यांनी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये मुसळधार पाऊस सांगितलेला आहे.