Chandrayaan 3 mission : चंद्रयानाचे इंजिन मध्यरात्री चालू करण्यात आले. चंद्रयान आता गुरुत्वाकर्षणाची कक्षा ओलांडून चंद्राच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. Chandrayaan 3 हे 14 जुलै रोजी पृथ्वीपासून अवकाशात सोडण्यात आलेले होते. हे चंद्रयान पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. हळूहळू यात प्रदक्षिणाची लांबी वाढत जात होती. मध्यरात्री 20 मिनिटांसाठी चंद्रयानचे इंजिन चालू करण्यात आले, यामुळे चंद्रयानाचा वेग वाढला. चंद्रयान 3 पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.
चंद्रयानाचा सध्याचा वेग दहा किलोमीटर प्रति सेकंद एवढा झालेला आहे. अशी बातमी इस्रोने जाहीर केली आहे.
Chandrayaan 3 चंद्रावर कधी उतरणार आहे ?
जवळपास 50 % चंद्रयान ३ ची मोहीम यशस्वीरित्या पार पडलेली आहे. आता पुढील चार दिवस प्रवास चंद्राच्या दिशेने चालू राहील. परत एकदा चंद्रयानचे इंजिन चालू केले जाईल आणि यानाला चंद्राच्या कक्षेत आणले जाईल.
त्यानंतर काही दिवस चंद्रयान चंद्राच्या कक्षेत लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत राहील, आणि शंभर किलोमीटर जवळ आल्यानंतर चंद्रावर जगा निश्चित करून ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रयान चंद्रावर उतरवण्याचा इसरो चा प्रयत्न आहे.
हे पण वाचा : Maharashtra Weather Update सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी तर काही भागात पावसाने घेतली विश्रांती.