नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं शेतकरी न्यूज संकेतस्थळावर हार्दिक असे स्वागत. जून महिना संपत आला त्यामुळे पेरणीची सुरुवात करण्याची वेळ झाली आहे. तरी अजून मान्सूनचा काही पत्ता नाही. येत्या 24 तास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाऊस होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
पाऊस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झाला असता. पण चक्रीवादळामुळे तो पाऊस झाला नाही. बिपर जॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्र मध्ये पावसाने पाठ फिरवली.
चक्रीवादळामुळे पावसासाठी अनुकुल वातावरण तयार झाले नाही पण आता अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे.
अजून पहा : Panjab Dakh महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाला सुरुवात होणार पंजाब डख हवामान अभ्यासक
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे.असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईमधील वांद्रे परिसरात आज पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली मध्ये सुद्धा मेघराजा बरसला आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आज सकाळपासून पाऊस पडत आहे. पण बऱ्याच ठिकाणी अजून पावसाने तोंडही दाखवलेले नाही. पावसा अभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या आहेत.हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सून हा 24 जून पासून सुरू होईल व त्याची तीव्रता ही जुलै पासून वाढेल.
हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे हा पाऊस अरबी समुद्रावर झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होणार आहे. अशा प्रकारच्या हवामानाच्या नवीन अपडेट तुम्हाला शेतकरी न्यूज या संकेतस्थळावर पाहायला मिळतील.
धन्यवाद.