पंजाब डख : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतकरी न्युज मध्ये स्वागत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात शनिवारपासून मान्सूनला सुरुवात होणार आहे. शनिवारी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी पावसामुळे लांबली होती.
हवामान अभ्यासक पंजाब डख असे म्हणतात की शेतकरी मित्रांनो घाबरू नका यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकरी पेरणी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतात. दरवर्षी पडत होता तसा दुष्काळ यावर्षी पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त काळजी करण्याचे कारण नाही.
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी हवामानाचा खूप अभ्यास केला आणि या निष्कर्षावर आले की 24 जून पासून ते 2 जुलै पर्यंत पाऊस पडणार आहे. मागे केलेला हवामान अंदाज चक्रीवादळामुळे चुकीचा ठरला. तसा पाऊस मागच्या वेळेस होणार होता पण चक्रीवादळामुळे हवेत असणारे भाष्पाचे प्रमाण वादळा सोबत वाहून गेले आणि पाऊस झाला नाही .
हे वाचा : शेतकऱ्यांसाठी पुढील आठ दिवस महत्त्वाचे आहेत पंजाबराव डख यांनी नवा हवामान अंदाज वर्तवला
हवामान अभ्यासक पंजाब डख यंदा अंदाज आहे की जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मुंबई येथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. तसेच पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात देखील पाऊस पडणार आहे. नाशिक मध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज त्यांनी शेतकऱ्यांना सांगितला आहे.
24 जून पासून ते २ जुलै पर्यंत पाऊस पडणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होणार आहे.
जर वातावरणात तसा बदल झाला तर याचा संदेश तुम्हाला लगेच शेतकरी न्यूज १८ (ShetkariNews18) वर मिळेल.
आभारी आहे, धन्यवाद.