शेतकऱ्यांसाठी पुढील आठ दिवस महत्त्वाचे आहेत पंजाबराव डख यांनी नवा हवामान अंदाज वर्तवला

पंजाबराव डख : शेतकरी मित्रांनो जून महिना चालू झाला की पावसाच्या सरी बरसू लागतात पण सध्या पावसाचा जून महिना संपत आला तरी पत्ता नाही बिपर जॉय  चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. पेरणीचा काळ सुरू झाला तरी अजून जमिनीत ओलावा तयार झालेला नाही त्यामुळे बरेच शेतकरी मित्र पेरणी करू शकत नाही ते पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Next eight days are important for farmers Punjabrao Dakh gave a new forecast
Next eight days are important for farmers Punjabrao Dakh gave a new forecast

या आलेल्या चक्रीवादळाचा फायदा हा गुजरातला मोठ्या प्रमाणात झाला आहे. या वादळामुळे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे परंतु महाराष्ट्रात अजून पावसाचा पत्ता सुद्धा नाही. 

केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले आहे की पुढील आठ दिवस शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असणार आहेत. पेरणीसाठी जमिनीत ओलावा तयार होणे खूप गरजेचे आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. 

मागील चार ते पाच वर्षाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की जून महिन्यात पाऊस हा शेवटच्या आठवड्यात पडतो. तरी शेतकऱ्यांनी जोपर्यंत जमिनीत एक दोन पाऊस पडल्यानंतर ओलावा तयार होत नाही तोपर्यंत पेरणी करणे टाळावे . 

पंजाबराव डख यांनी नवा अंदाज वर्तवला

पंजाबराव डख यांनी हवामानाचा नवा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार पावसाचे आगमन हे 23 जून च्या नंतर ते 15 जुलै या दरम्यान होईल. तरीसुद्धा शेतकरी मित्रांनी पेरणी करण्यासाठी दोन-तीन पाऊस होण्याची वाट पाहावी. मागे सुद्धा पंजाबराव डख यांनी 17 ते 18 जून पर्यंत पाऊस पडेल असे सांगितले होते पण चक्रीवादळामुळे हा पाऊस पुढे ढकलला गेला. 

Weather In Maharashtra Today | येणाऱ्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पडणार उष्णतेची तीव्र लाट आणि या ठिकाणी होणार विजांसह पाऊस.

Leave a Comment