येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्र मध्ये पाऊस दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नुकतेच आलेले चक्रीवादळ म्हणजेच बिपरजॉय चक्रीवादळामुळं यांना महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन लांबणीवर पडले आहे.
Maharashtra Weather Forecast : काही दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला होता पण येत्या तीन दिवसात मान्सून पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागात येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. पण मान्सूनला थोड्या लांबणीवर टाकण्यास वातावरण तयार झाले आहे त्यामुळे काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल.
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन हे 23 जून पासून होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तरी शेतकरी मित्रांनी पेरणीसाठी घाई करू नये. पावसाच्या एक दोन सरी आल्यानंतर ज्यावेळी जमिनीत ओलावा तयार होईल त्यावेळेस पेरणी करण्यास सुरुवात करावी. 23 जून पासून सुरू होणारा पाऊस जुलैमध्ये जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळं यांना महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन लांबणीवर पडले
नुकत्याच आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळं हवेत असणारे बाष्प हवे सोबत वाहून गेले. त्यामुळे महाराष्ट्रात येणारा जून मधील पाऊस लांबणीवर पडला आहे .दोन ते तीन दिवसात पुण्यामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यात पुढील पाच दिवस वातावरण कसं असेल ?
पुढील पाच दिवसांमध्ये पुण्यात अंशता ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
शेतकऱ्यांसाठी पुढील आठ दिवस महत्त्वाचे आहेत पंजाबराव डख यांनी नवा हवामान अंदाज वर्तवला