जून महिना संपत आला तरी अजून मान्सूनचा पत्ता नाही.पावसाने कोकणात चांगल्या प्रकारची हजेरी लावली आहे.पण महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मान्सून येण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण अजून महाराष्ट्रामध्ये तयार झालेले नाही त्यामुळे बऱ्याच भागामध्ये अजूनही मान्सून येत नाही.
गुजरात मध्ये आलेल्या बीपरजॉय चक्रीवादामुळे मान्सूनवर मोठ्या प्रमाणात परीणाम दिसून आला.
पण आता मान्सून याण्यासाठी पोषक असे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झाले आहे. प्रसिद्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की 25 जूनपासून महाराष्ट्रामध्ये पाऊसाची तीव्रता वाढणार आहे. आणि ती जुलै महिन्यापासून जास्त होणार आहे.
शेतकरी बांधवांनो हवामान अभ्यासक हवामानाचा अंदाज सांगतात व यावर विश्वास ठेऊन बरेच शेतकरी मित्र पेरणीपूर्वी नियोजन करतात. बरेच शेतकरी पेरणीसाठी बीबीयाने खरेदी करतात. याचाच फायदा बीबीयाने विक्रेता घेतात. बीबीयांनाचा तांत्रिक तुटवडा तयार करतात. आशा प्रकारे केलेल्या तांत्रीक तुटवड्या मूळे बियाणांची किंमत आहे त्या किंमती पेक्षा जास्त रुपयांमध्ये विकले जातात. यामध्ये खरे नुकसान होते ते शेतकरी बांधवांचे.
हे सर्व टाळण्यासाठी योग्य प्रमाणात पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा तयार होतो असे एक-दोन पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात करावी. कोणाच्या हवामान अंदाजावर अवलंबून न राहता जमिनीत ओलावा तयार झाल्यानंतरच पेरणी करा.