IMD : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस या राज्यांमध्ये सलग पाऊस होणार आहे. हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा असणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काय आहे आजचा हवामान अंदाज । IMD
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. तसेच हा पाऊस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दिनांक 28 जून नंतर मुसळधार पावसाला सुरुवात होईल.महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तरी या पावसाची तीव्रता पुढील दोन महिन्यात अजून वाढणार आहे.
पुढील दोन-तीन दिवसात हवामानाचा अंदाज काय आहे ?
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसात पाऊस पडणार आहे. हा पाऊस चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पडणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा येथे पाऊस पडणार आहे. इतर भागांमध्ये हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. जून महिना संपत आला तरीही पाऊस काही यायचे नाव घेत नाही. पण आजपासून चालू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता कमी केली आहे.
पुढील दोन ते तीन दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व 28 जून झाल्यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.