Weather Forecast : सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. तरी आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणी मान्सूनचे आगमन झालेले आहे. मुंबई आणि जवळपासच्या अनेक परिसरामध्ये सकाळपासून सतत पाऊस पडत आहे. आणि महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या अजून पत्ता सुद्धा नाही. या भागातील मित्र आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे.
कोकणामध्ये दाखल झालेली मान्सूनची वारे पुढे सरकण्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हवामान खात्याने कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. भारतातील हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार 24 ते 25 जून पासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे.
अजून पहा : पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटी मान्सूनचे झाले आगमन महाराष्ट्रातील या शहरांना अलर्ट जारी
मराठवाडा परिसरामध्ये 2४ जून पासून ते 30 जून पर्यंत या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मराठवाड्यामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
सध्याचा पाऊस आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड मार्गे तसेच गोंदिया गडचिरोली बंगालच्या उपसागराच्या दिशेने पुढे सरकत आहे तो एका दिवसात मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. आज सकाळ पसंद मुंबई मध्ये पाऊस पडत आहे. आज पडणार पाऊस पुढे मध्य महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
छत्तीसगड, ओडिशा, बिहार व मध्य प्रदेशमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जुलै महिन्यापासून पावसाची तीव्रता वाढणार आहे व तो संपूर्ण देशांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्तवले जात आहे.