IMD Rain Alert : येत्या 24 तासांमध्ये या भागात पडणार मुसळधार पाऊस

IMD Rain Alert : येत्या 24 तासांमध्ये या भागात पडणार मुसळधार पाऊस
IMD Rain Alert : येत्या 24 तासांमध्ये या भागात पडणार मुसळधार पाऊस

IMD Rain Alert (मुंबई) : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मान्सून दाखल झालेला असला तरीही राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अजूनही ठाव- ठिकाणा नाही. मुंबई कोकण या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाचा (IMD Rain Alert) आज कोकणात रेड अलर्ट दिला आहे.

पुढील चार ते पाच तासात मुंबई हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

सोलापूर,धुळे, छत्रपती संभाजीनगर,जालना, हिंगोली तसेच जळगाव मध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD Rain Alert) वर्तवला आहे.

के.एस.होसाळीकर IMD प्रमुख पुणे आज सांगितल्याप्रमाणे पुढील 24 तासात विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणामध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

IMD Rain Alert  9 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ? 

IMD : रत्नागिरी, कोल्हापूर तसेच पुणे आणि पालघर, रायगड या भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. साताऱ्यामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाण्यामध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिला आहे. 

नाशिक आणि जवळपासच्या परिसरात पुढील तीन ते चार तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये पुढील 3 ते 4 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे.

या सर्व जिल्ह्यांना मुसळधार पाऊस होणार आहे.

हे पण वाचा : Havaman Andaj पंजाब डख यांचा हवामान अंदाज पुढील तीन दिवस होणार या भागात जोरदार पाऊस

 

 

Leave a Comment