IMD ( India Meteorological Department ) : भारतीय हवामान विभाग आपल्या हवामानात होणाऱ्या बदलाची अपडेट आपल्याला देत असते. त्याचप्रमाणे IMD ने उद्याचे हवामान याबद्दल एक नवीन अपडेट दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी पडणार असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे. कारण ऑगस्ट महिना जसा चालू झाला तसा पावसाचा जोर हा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये कमी स्वरूपात झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. यात बऱ्याच भागांमध्ये अजून पावसाची सुरुवात देखील झालेली नाही. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे पण वाचा : Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव कधी वाढणार ? टोमॅटो सारखे आता वाढणार कांद्याचे बाजार भाव.
IMD : उद्याचे हवामान
हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. जुलै महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात पाऊस कमी झाला होता. तर अनेक ठिकाणी जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाऊन त्यांचे आर्थिक नुकसान झालेले होते. शहरांमध्ये रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झालेली होती.
त्या नंतर ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात अनेक भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये कोकण विभाग सोडून इतरत्र सर्व भागात मध्यम तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. अशाप्रकारे ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला मिळतो.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
उद्याचे हवामान : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार 16 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसात पाऊस पडेल तो मध्यम ते तुरळक स्वरूपाचा असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.