Heavy Rain Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं शेतकरी न्युज 18 या संकेतस्थळावर हार्दिक असे स्वागत. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या समोर एक मोठा प्रश्न आहे की पाऊस कधी पडेल ? जून महिना संपत आला तरी पाऊस झाला नाही. अजूनही काही भागात पाऊसाची सुरुवात झालेली नाही. पाऊस लांबण्याचे मुख्य कारण हे चक्रीवादळ हे आहे.
मान्सूनची सुरुवात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होते. पण अजूनही पाऊस काही भागात आलेला नाही. अनेक शेतकरी मित्र खरीप पिकाच्या पेरणीसाठी पावसावर अवलंबून आहेत. पण पावसाअभावी ते पेरणी करू शकत नाही.
आज बऱ्याच ठिकाणी पावसाचे आगमन झालेले आहे. पण हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही पेरण्यासाठी शेत जमिनीमध्ये योग्य प्रमाणात ओलावा निर्माण होणे गरजेचे आहे योग्य प्रमाणात जमिनीमध्ये ओलावा झाल्यानंतर शेतकरी जमिनीमध्ये पेरणी करू शकतो.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सद्या मान्सून येण्यासाठी योग्य प्रमाणात अनुकूल वातावरण तयार झाले आहे. जून महिन्याच्या शेवटी मान्सून जोर धरणार आहे आणि हा पाऊस जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुसळधार स्वरूपात पडणार आहे.जून महिन्याच्या अखेरपासून ते सहा जुलै पर्यंतच्या कालावधीमध्ये मान्सून सक्रिय होणार आहे.असा हवामान खात्याचा अंदाज आहे.अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि इतर परिसरामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे. हवामान चांगल्या प्रमाणात असल्यास दक्षिण कोकणात जोरदार पाऊस पडेल.
30 जून पासून ते 7 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.