Punjab Dakh ( पंजाब डख हवामान अंदाज 2023) : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. या तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून परतीच्या प्रवासावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. यानुसार आता दिल्ली, हरियाणा राजस्थान सारख्या राज्यामध्ये मान्सून परतीचा प्रवास सुरू केलेला आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. महाराष्ट्रात अजूनही मोसमी पाऊस काही भागांमध्ये सुरूच आहे. 10 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला होता. यावर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख ( Punjab dakh) हवामान अंदाज 2023 जारी केलेला आहे. ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमी असणार आहे असे पंजाबराव यांनी सांगितलेले आहे. पंजाबराव डख ( Punjab dakh) यांनी नवरात्रीच्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. पण नवरात्री उत्सवामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे असे त्यांनी सांगितले आहे.
दसऱ्याच्या सणाला महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया गेला तरी रब्बी हंगामामध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळेल असे पंजाबराव डख (Panjabrao dakh live today) यांनी सांगितले आहे.
पंजाब डख हवामान अंदाज 2023 | Punjab dakh weather forecast
24 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात मुसळधार पाऊस होणार नाही असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. 25 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
दिवाळी सुरू झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेली आहे. आता दिवाळीमध्ये जोरदार पाऊस पडतो का हे पाहण्यासाठी सगळ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झालेला होता. तर काही भागांमध्ये अजूनही पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या भागातील शेतकरी अजूनही पावसाची वाटच पाहत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कधी येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
IMD : राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, कोकण आणि गोवा वगळता या भागांमध्ये राहणार कोरडे हवामान.