Rain Updates : पुढील तीन दिवसात होणार पावसाचा कमबॅक, महाराष्ट्रातील उरलेल्या सर्व भागात पडणार पाऊस

Rain Updates : पुढील तीन दिवसात होणार पावसाचा कमबॅक, महाराष्ट्रातील उरलेल्या सर्व भागात पडणार पाऊस
Rain Updates : पुढील तीन दिवसात होणार पावसाचा कमबॅक, महाराष्ट्रातील उरलेल्या सर्व भागात पडणार पाऊस

Rain Updates Pune : जुलै महिना जवळपास संपत आलेला आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये भरपूर पाऊस झाला. तेथील शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या पण महाराष्ट्रातील असा काही भाग आहे की ज्या भागात अजून पाऊस लपून बसलेला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दोन दिवसापासून मोसमी वाऱ्यांचा जोर वाढलेला दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे 19 ते 22 जुलै या दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारपट्टीवर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हे पण वाचा : Tomato Price Today Hike १० ते १२ रुपये मिळणारे टोमॅटो आज 160 रुपये किलो कसे झाले ?

कोकण आणि मुंबईमध्ये पुन्हा पडणार पाऊस । Rain Updates 

गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जवळपास सात-आठ दिवस राज्यात पाऊस पडलेला नाही. हे पाहून राज्यातील नागरिक चिंतेत पडलेले आहेत. कोकणामध्ये शुक्रवारी सकाळपासून पाऊस पडत आहे. पुढील आठवड्यामध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

येणाऱ्या पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार बहुतांश महाराष्ट्र मध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये हा पाऊस मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस (Rain Updates) येण्याची शक्यता आहे. 

हे पण वाचा : Panjab Dakh 19 तारखेपासून ते जुलै च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत होणार मुसळधार पाऊस.

Leave a Comment