Weather Today Maharashtra : IMD ने हवामानाचा अंदाज दिलेला आहे. या अंदाजानुसार पूर्व विदर्भामध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे आज विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कोकणामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उरलेल्या महाराष्ट्राच्या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा : Maharashtra Rain update : राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार एन्ट्री या तारखांना बरसणार राज्यामध्ये मुसळधार पाऊस.
हवामान अंदाज विदर्भ । Weather Today Maharashtra
आजचे हवामान: विदर्भात आज सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेले आहे . आय एम डी ने दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस मध्यम ते तुरळक पडणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार हवेच्या दाबाचा पट्टा हा कर्नाटक दक्षिण भागात आणि कोमोरिन पर्यंत आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये वादळाची स्थिती चक्राकार आहे. तसेच हिमालयाच्या पायथ्याशी मान्सून हा साधारण रूपात आहे, त्यामुळे पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होत आहे.
हे पण वाचा : Maharashtra Rain Alert : आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र, या तारखे नंतर महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस.