Maharashtra Rain Alert : आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र, या तारखे नंतर महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस.

Maharashtra Rain Alert : आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र
Maharashtra Rain Alert : आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला, हवामान विभागाने अंदाज दिला आहे की ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. नंतर उरलेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होणार आहे. या पावसासाठी तयार झालेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या 48 तासात हवामान अंदाज

Pune Rain Update: बऱ्याच जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सुद्धा आलेला होता. तर काही ठिकाणी अजून पावसाचा ठाव-ठिकाण नाही. त्यामुळे ज्या भागात अजून पाऊस पडलेला नाही तेथील प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.आता हा पाऊस कधी पडणार हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.

पुण्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी पावसा संदर्भात एक अंदाज वर्तवलेला आहे. त्या अंदाजानुसार 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान  पुण्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यानंतर पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होऊन मुसळधार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे.

हे पण वाचा : Mumbai Weather Forecast 15 Days : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे? हवामान उद्या पाऊस वेळ टेबल.

आज पाऊस पडेल का महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : येत्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा खंड पडणार आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. 21 ऑगस्ट पासून महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात होणार आहे.ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्रावण सऱ्या बरसण्यास सुरुवात होणार आहे.

पाऊस कधी पडणार आहे | Maharashtra Rain Alert

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज दिलेला आहे.

जपान किनारपट्टीवरील दोन चक्रीवादळांनी बंगालच्या उपसागरातील आद्रता ईशान्य कडे म्हणजे प्रशांत महासागरात ओढून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला ऑगस्टमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली. पण ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये हे चक्रीवादळ शांत होणार आहे, आणि पावसाचे वातावरण तयार होऊन संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे.  

हे पण वाचा : India Meteorological Department : येत्या 48 तासात हवामान अंदाज, या भागात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा.

 

Leave a Comment