Weather Update Maharashtra : जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील अनेक नद्या आले तसेच ओढे भरून वाहत होते. काही ठिकाणी पूरही आला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर महाराष्ट्र मध्ये आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळाला, पण हवामान विभागाने पुण्यासह इतर काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
आज पाऊस पडणार आहे का 2023 ? हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार येथे दोन ते तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपात पाऊस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसेच हवामान विभागाने चार जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट दिलेला आहे.
हे पण वाचा : Chandrayaan 3 ने अर्धी लढाई जिंकली आहे आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार ?
आज पाऊस पडेल का महाराष्ट्र
Weather Update : पाऊस कधी पडणार आहे ? गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली होती. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पुण्यासह इतर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या काही तासात या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे.
जुलै महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. पण गेले दोन ते तीन दिवस ऑगस्ट चालू झाल्यानंतर पावसाचा जोर कमी पडलेला आहे.हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा : Maharashtra Weather Update सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी तर काही भागात पावसाने घेतली विश्रांती.