Weather Update : हवामान विभागाचा काय आहे नवीन हवामान अंदाज ?
उद्याचे हवामान काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळेल. तर काही भागांमध्ये गारपीट होऊन मोठ्या प्रमाणात वादळ येण्याची शक्यता आहे. असा संमिश्र वातावरण तयार होण्याची शक्यता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग असणारे वारे मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तसेच मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडणार आहे. आज आपल्याला मुंबई आणि इतर परिसरामध्ये उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळाली. तर आज संध्याकाळी हलक्या पावसाचा अंदाज या भागांमध्ये आहे. नाशिक, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि बीडमध्ये उष्णतेच्या लाठेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
पुणे हवामान अंदाज 30 दिवस
Pune Weather Update : आज पुण्यामध्ये आपल्याला दिवसभर प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट पाहायला मिळाली, तर सायंकाळी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पुण्यातील बहुतेक भागांमध्ये झाला. पुणे शहरांमध्ये पूर्व भागासह बारामती, हवेली, शिरूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपात बरसला. पुढील काही दिवस संपूर्णपणे जिल्ह्यात उष्णतेची लाट तसेच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह कमाल तापमान पुन्हा एकदा वाढलेले आहे. काही भागांमध्ये तापमान 41 अंशाच्या पार गेलेले होते. शिरूर तालुक्यातील काही भागांमध्ये तापमान 43.1 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. सरासरी तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. काही भागात सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली.
पुढील काही दिवसांमध्ये पुण्यात दुपारनंतर ढगाळ तसेच अनेक भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानाने विभागाने दिलेली आहे.
तसेच सायंकाळी बारामती तालुक्यातील अनेक भागात ढग दाटून आलेले होते. या ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावलेली आहे. कर्जत, इंदापूर, फलटण आदी तालुक्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. बारामतीच्या अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत आपल्याला पाऊस पाहायला मिळाला आहे.