Weather Update Maharashtra : आज सकाळी मोठ्या प्रमाणात ऊन पडून उष्णतेचा पारा वाढलेला होता, पण अचानक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आलेले आहेत. ढगाळ वातावरणासह अनेक भागात पावसाने सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील काही भागात तापमान 42 अंशाच्या पार गेलेले आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिलेला आहे. तर उरलेल्या भागांमध्ये उष्णतेचा फटका तसाच राहणार आहे.
मराठवाड्याच्या परिसरात समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर वाऱ्याची स्थिती चक्राकार झालेली आहे. त्यामुळे दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्याचा प्रवाह खंडित झाल्याने या भागात आपल्याला कमी दाबाचा पट्टा तयार झालेला पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. आज दिनांक 20 एप्रिल रोजी नगर, पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, सोलापूर, सांगली, लातूर नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या भागात ढगाळ वातावरणासह वादळी वारे वाहू लागलेले आहेत.
हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिलेला आहे येल्लो अलर्ट | Weather Update Today
पुढील काही तासात या भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.
उद्या पाऊस पडणार आहे का ?
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. अनेक भागात रिमझिम रिमझिम सरी बरसू लागलेल्या आहेत. काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उष्णतेचा फटका कायम राहणार आहे.