Maharashtra rain forecast : हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज मुंबई, पुणे आणि रत्नागिरी मध्ये दिवसभर खूप पाऊस पडला, हा पाऊस दिवसभर राज्याच्या अनेक भागांमध्ये संतत धारेने चालू होता.अनेक शहरी भागांमध्ये पुराचे पाणी बाहेर जाण्यासाठी जागा नसल्याकारणाने हे संपूर्ण पाणी रस्त्यावर दोन्ही बाजूने जमा झालेले होते. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात दूर-अवस्था आज आपल्याला पाहायला मिळाली.
बंगालच्या उपसागरात तसेच दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस येत्या काही तासात जोर पकडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
येत्या पाच दिवसात कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे | Maharashtra rain forecast 5 days
दिनांक 26 जुलै ते 19 जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच भंडारा, कोल्हापूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ अशा भागांमध्ये सुद्धा हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अलर्ट जारी केलेला आहे.
आजचा हवामान अंदाज | Maharashtra rain forecast today
आज पावसाने विविध भागांमध्ये कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली. राज्यातील कमी दाबाचा पट्टा अजून पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात आणि घाटमाथ्यावर आज तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. नागपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या भागांमध्ये विजांसह येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडणार आहे.
तसेच आज मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केलेला होता, त्या भागातील अनेक शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली होती.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पडणार आहे.
हे पण वाचा : panjab dakh havaman andaj today पंजाब डख यांचा पावसासाठी एक महत्त्वाचा अंदाज, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी