Maharashtra Havaman Andaj Today : महाराष्ट्रात अजून किती दिवस पाऊस पडणार ? हवामान अंदाज महत्त्वाची अपडेट

Maharashtra Havaman Andaj Today : महाराष्ट्रात अजून किती दिवस पाऊस पडणार ? हवामान अंदाज महत्त्वाची अपडेट
Maharashtra Havaman Andaj Today : महाराष्ट्रात अजून किती दिवस पाऊस पडणार ? हवामान अंदाज महत्त्वाची अपडेट

Maharashtra Havaman Andaj Today : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात खूप मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भागात पाऊसाने चांगली हजेरी लावली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात मुसळधार पाऊसाचा अंदाज दिला आहे.काही भागात पूर आल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस अजून किती दिवस पडणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे.  

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केलेले आहे. तर महाराष्ट्रातील अनेकांचे भागत अजून पावसाचा अजून ठाव-ठिकाण नाही. 

पुणे २९ जुलै २०२३ । Maharashtra Havaman Andaj Today 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग,मुंबई, ठाणे, यवतमाळ, चंद्रपूर, सातारा, नांदेड, अमरावती, पुणे, बुलढाणा अशा अनेक शहरांना पावसाने झोडपून काढलेले आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Rain Forecast येत्या 24 तासात या जिल्ह्यांमध्ये पडणार अति मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला रेड अलर्ट !

पुढील पाच दिवसांसाठी हवामान अंदाज | Maharashtra Havaman Andaj Today For 5 Days

आज पाऊस पडणार आहे का ?  महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर काही राज्यांमध्ये रेड अलर्ट आता संपलेला आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रमध्ये पाऊस कमी होणार आहे असा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे. 

कोकण आणि जवळपासच्या काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आता आपल्याला कमी पाहायला मिळेल. 

ठाणे परिसरामध्ये प्रचंड स्वरूपात पाऊस पडला तसेच मुंबईतील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी या परिसरामध्ये तीव्र स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

हे पण वाचा : Maharashtra Weather Forecast मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी, पुढील 24 तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी.

Leave a Comment