पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटी मान्सूनचे झाले आगमन महाराष्ट्रातील या शहरांना अलर्ट जारी

हवामान अभ्यासक पंजाब डख (2)
हवामान अभ्यासक पंजाबराव डख

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं शेतकरी न्यूज 18 या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत. बऱ्याच दिवसापासून शेतकरी हा पावसाची वाट पाहत आहे. दरवर्षीप्रमाणे जून महिन्याचा शेवट आला तरी पावसाचा कोठे ठाव ठिकाणा  नाही. या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग हा चिंतेत पडला आहे. जून महिन्यात आला तरी अजून पेरणी नाही.  मग पेरणी करायची कधी ? मान्सून  येणार कधी असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांना पडले असतील. 

अजून पहा : शेतकऱ्यांसाठी पुढील आठ दिवस महत्त्वाचे आहेत पंजाबराव डख यांनी नवा हवामान अंदाज वर्तवला

महाराष्ट्रात असणाऱ्या हवामानाची अनुकुलता पाहता हवामान खात्याने येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवला आहे.  ही बातमी ऐकताच बऱ्याच शेतकरी मित्रांना दिलासा मिळाला आहे. 

बिपर जॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्र मध्ये जून मध्ये पडणारा पाऊस पुढे ढकलला गेला.  आणि अजूनही तो महाराष्ट्रात येण्याची नाव घेत नाही. पण आता बिपर जॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला आहे. पाऊस येण्यासाठी ज्या प्रकारचे वातावरण लागते तसे अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. 

या शहरांना अलर्ट जारी 

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे येथे 24 तासात  अलर्ट जारी केला आहे.  तर सकाळपासून  या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्याची सुरुवात होतास संपूर्ण देशात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

अजून पुढच्या चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात जोरदार असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिला आहे. 

अजून पहा : Kanda Chal Anudan Yojana – कांदा चाळ अर्ज करून योजनेचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता.

 

Leave a Comment