Blood Donation Benefits In Marathi : “रक्तदान हेच जीवनदान” रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी | रक्तदान करण्याचे फायदे

Blood Donation Benefits In Marathi : रक्तदान हेच जीवनदान
Blood Donation Benefits In Marathi : रक्तदान हेच जीवनदान

Blood Donation Benefits In Marathi : रक्तदान घोषवाक्य “रक्तदान हेच जीवनदान”. हे आपण सगळीकडे ऐकत आलेलो आहे. एका ठराविक वयानंतर शरीराची योग्य वाढ झाल्यानंतर रक्तदान करणे योग्य ठरले जाते. तुम्ही रक्तदान करून एखाद्या माणसाचा जीव वाचून त्याला एक नवीन जीवदान देऊ शकता. रक्तदान करा असे सगळ्यांना आव्हान दिले जाते. आपल्या समाजामध्ये अनेक असे लोक आहेत की त्यांना रक्तदानाचे महत्त्व अजूनही माहिती नाही. रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा आपण जीव वाचवू शकतो. त्याचप्रमाणे रक्तदान केल्याचे आपल्या स्वतःलाही काही फायदे आहेत. हे कोणालाही माहीत नसते. त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. 

रक्तदान करण्यासाठी आवश्यक वय | Blood Donation Ege

रक्तदान करण्यासाठी आपल्याला 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. रक्तदानासाठी म्हणजे Blood Donation साठी 18 ते 65 वयापर्यंत व्यक्ती रक्तदान करू शकतो. भारतामध्ये रक्तदान करणाऱ्या लोकांचा डेटा हातात घेतला तर असे समजते की भारतात फक्त 37% लोकच रक्तदान करतात. रक्तदान करायचे म्हणल्यावर बऱ्याच लोकांना भीती वाटते. पण हे रक्तदान केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे आहेत याबद्दल कोणतीही माहिती नसते. तर ती आपण पाहणार आहोत. 

रक्तदान करण्याचे फायदे | Blood Donation Benefits In Marathi 

  1. रक्तदानामुळे वजन कमी होते : बरेच लोकांचे वजन हे खूप जास्त असते त्यांच्या शरीरामध्ये  रक्ताचे प्रमाण सुद्धा जास्त असते. अशा लोकांसाठी रक्तदान करणे खूप फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यामुळे अशा लोकांना वजन कमी करण्यासाठी मदत होते. रक्तदानामुळे वजन कमी होते असे म्हणणे सुद्धा नियमांमध्ये बसत नाही. पण रक्तदान केल्यामुळे ब्लड सेल्सचे अधिक उत्पादन होऊन याचा शरीराला फायदा होतो.
  2. रक्तदानामुळे ​रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते : रक्तदान केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे शारीरिक आरोग्यासाठी रक्तदान करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणे आवश्यक आहे. रक्तदान केल्याने रक्तामधील प्लाजमा ल्युको साईट्स वाढवण्यास मदत मिळते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
  3. हृदयविकाराचा धोका कमी होतो : Blood Donation नेहमी केल्याने शरीरामधील आयरन चे प्रमाण योग्य प्रमाणात राहते. शरीरामधील लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात झाले आहे आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका वाढतो. यामुळे बऱ्याच जणांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. रक्तदान केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह योग्य प्रमाणात होऊन हृदयविकाराचा धोका होत नाही.
  4. रक्तदानामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो : नियमित रक्तदान केल्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहते. लोहाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या  ब्लॉक होतात. शरीरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास आपल्याला ब्लड कॅन्सर होऊ शकतो. रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरातील लोह योग्य प्रमाणात राहते त्यामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. 

रक्तदान करण्याचे हे सर्व फायदे जरी असले तरी रक्तदान करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या व रक्तदानाबद्दल संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच रक्तदान करा. (Blood Donation Benefits In Marathi)

रक्तदान किती दिवसांनी करता येते ?

रक्तदान करण्यासाठी माणसाने निरोगी असणे आवश्यक आहे. तसेच रक्ताशी संबंधित कोणताही आजार असू नये. या सर्व घटकांची पडताळणी केल्यानंतर आपण रक्तदानासाठी पात्र होऊ शकता. एक निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान कर शकतो. त्यासाठी जवळच्या रक्तपेढीत किंवा रक्तदान  शिबिरामध्ये सामील होऊन आपण रक्तदान करू शकता.

रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी 

  • पौष्टिक आहार : रक्तदान केल्यानंतर पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पौष्टिक आहार घेतल्यामुळे शरीराला पुन्हा एकदा रक्त तयार करण्यासाठी मदत मिळते.
  • प्रोटीन आणि आयरन : रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरातील प्रोटीन आणि आयरन कमी होतात. याची कमी भरून काढण्यासाठी आपल्याला दूध, दही, मांस, ड्रायफ्रूट्स या प्रकारच्या अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. 
  • पाण्याची कमतरता : रक्तदान केल्यानंतर शरीरामधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी रक्तदान केल्यानंतर पाण्याची कमी भरून काढण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
  • विश्रांती : रक्तदान केल्यानंतर आपल्याला विश्रांती घेणे आवश्यक आहे विश्रांती घेतल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळवून चक्कर येण्याची शक्यता टाळता येते.

रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते

रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते हे अनेक गोष्टीवर अवलंबून असते.अधिक तर ३५० ml 450 ml एवढे रक्त रक्तदानामध्ये दान केले जाते. याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला रक्तदान करण्यापूर्वी  जवळच्या रक्तपेढीत किंवा रक्तदान शिबिरामध्ये दिले जाते.

रक्तदान घोषवाक्य 

  • रक्तदान हेच जीवनदान.
  • तुम्ही दिलेल्या रक्तामुळे तुम्ही एक नवीन माणसाला जीवदान देऊ शकता.
  • रक्ताची गरज कोणाला आहे तुम्हाला मला आणि सर्वांना.
  • रक्तदान हे श्रेष्ठदान चला तर सगळ्यांनी मिळून रक्तदान करूया.
  • रक्त हे कधी कोणत्या कारखान्यात बनणार नाही त्यासाठी आपल्याला रक्तदान करणे आवश्यक आहे.
  • रक्तदान करा आणि जीवन वाचवा.
  • माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे दान रक्तदान हेच जीवनदान.

 

Leave a Comment