Hava Pradushan In Marathi : वायु प्रदूषण म्हणजे काय ? हवा प्रदूषण कारणे ,हवा प्रदूषण प्रस्तावना ,हवा प्रदूषणाचे परिणाम या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर मध्ये पाहणार आहोत. माणसाला जिवंत राहण्यासाठी श्वास घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण आजकालच्या काळात हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे हवेचे होणारे प्रदूषण कशामुळे होते आणि आपण हे प्रदूषण कशा प्रकारे थांबवून आपल्या पृथ्वीला प्रदूषणापासून वाचू शकतो याची आज आपण माहिती घेणार आहोत.
हवा प्रदूषण प्रस्तावना | Hava pradushan in marathi essay
- पृथ्वीच्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे घातक पदार्थ आहेत. हे पदार्थ मानवासाठी योग्य नाहीत. हे पदार्थ माणसाच्या जीवनावर परिणाम करू शकतात. यामुळे अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता मानवाला आणि पृथ्वीवर राहणाऱ्या इतर प्राण्यांना होऊ शकते.
- रोजच्या होणाऱ्या प्रदूषणामध्ये अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये वाहतूक, जीवाश्म इंधन,जंगलामध्ये लागलेली आग, अचानक आलेले वादळ, कारखान्यांमधून निघणारा धूर असे अनेक घटक कारणीभूत आहेत. संपूर्ण घटकांचा परिणाम पृथ्वीच्या ओझोन लेयर वर होत आहे. पृथ्वीची ओझोन लेयर सूर्याच्या घातक किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करत असते. पण वातावरणात असलेल्या या घातक घटकांमुळे ओझोनचे लेयर आता पातळ होत चालली आहे. यातून अनेक घातक अशी सूर्याची किरणे डायरेक्ट आपल्या त्वचेवर पडून अनेक प्रकारचे रोग तयार करत आहेत.
- या संपूर्ण प्रदूषणाची मानवी जीवनावर अत्यंत घातक परिणाम होऊ शकतात. फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग, श्वास घेताना होणारा त्रास अशा प्रकारे अनेक प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव मानवाला होऊ शकतो. तर हे होणारे प्रदूषण नियंत्रणात कसे आणायचे आहे आणि माणसांमध्ये जनजागृती कशी करायची याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत.
वायू प्रदूषण उपाय योजना मराठी | Hava Pradushan In Marathi
- हवा प्रदूषण उपाय योजना (Hava Pradushan In Marathi) यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो त्यांपैकी काही आपण सविस्तर मध्ये पाहूयात.
- हवा प्रदूषण थांबवायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्याला हवा प्रदूषण कशामुळे होते याचा अभ्यास केला पाहिजे. हवा प्रदूषणाची सुरुवात कुठून होते. कोणकोणत्या गोष्टीमुळे हवा प्रदूषण होते हे समजून घेतले पाहिजे. प्रदूषण कोणत्या भागात किती प्रमाणात होत आहे हे पाहण्यासाठी हवेच्या स्थितीवर लक्ष दिले पाहिजे.
- खाजगी वाहतूक थांबून सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे. ज्यामुळे कमी प्रमाणात वाहनांचा उपयोग होऊन यामध्ये तयार होणारे धुराचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण गोष्टीचा फायदा हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी होईल.
- सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांसारख्या निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या ऊर्जास्रोतांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये वाढविला पाहिजे. ज्यामुळे कृत्रिम रित्या तयार केलेल्या ऊर्जेमुळे तयार होणारे प्रदूषण कमी होईल.
- लोकांना हवा प्रदूषण कशामुळे होते याची शिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून लोक ज्या गोष्टींमुळे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते अशा गोष्टींचा उपयोग कमी करतील.
- झाडे ही हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. वातावरणात असलेला कार्बन डाय-ऑक्साइड झाडे आपल्या अन्नप्रक्रियेत शोषून घेतात. त्याबद्दल ते हवेत स्वच्छ ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला झाडांची तोड कमी केली पाहिजे. जेणेकरून झाडे जास्तीत जास्त प्रमाणात वातावरणातील कार्बन डायऑक्साइड घेऊन हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतील.
- त्याचप्रमाणे आपण दररोज वापरत असलेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वातावरणात धूर सोडला जातो. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे घातक गॅस वातावरणाच्या हवेत मिक्स होतात. यासाठी आपण सौर उर्जेवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करून वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करू शकतो.(वायू प्रदूषण प्रकल्प )
हवा प्रदूषणाचे परिणाम
- हवा प्रदूषणाचे परिणाम खालील प्रमाणे (Hava Pradushan In Marathi) :
- हवा प्रदूषणाचे परिणाम हे मानवाच्या शरीरावर होतात. यामध्ये दमा, कॅन्सर, घसा दुखणे, सर्दी अशा अनेक प्रकारचे आजार मानवाला होतात.
- हवा प्रदूषणाचे परिणाम हे वनस्पतींवर सुद्धा होतात. त्यामुळे झाडांची पाने वाळणे, फळे कमी प्रमाणात लागणे, झाडाची वाढ कमी होणे अशा अनेक प्रकारचे परिणाम आपल्याला झाडावर पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे बियांमधून रोपांचे उत्पन्न कमी प्रमाणात होणे.
- हवा प्रदूषणामुळे हवामान हवेचे तापमान वाढते. याचा थेट परिणाम पृथ्वीच्या ओझोन लेयर वर होतो. ओझोन लेयर ची पातळी कमी झाल्यामुळे सूर्याची घातक किरणे माणसाच्या शरीरा पर्यंत पोचून माणसाला त्वचेची अनेक रोग होतात.
वायू प्रदूषण महत्व मराठी | Hava Pradushan In Marathi
जागतिक तापमान वाढ
जागतिक तापमानवाढ हा वायू प्रदूषणाचा मुख्य परिणाम आहे. ग्लोबल वार्मिंग हा प्रदूषणामुळे असणारा चिंतेचा विषय आहे. ग्लोबल वार्मिंग हे हरितगृहामुळे होते. जागतिक तापमान वाढल्यामुळे वादळांची निर्मिती होते. तसेच अंटार्टिका मधील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती तयार होते.
हवामान मध्ये बदल
जेव्हा पृथ्वीवरील तापमानामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त प्रमाणात होते, त्यावेळी पृथ्वीवरील वातावरण चक्र बिघडते. या होणाऱ्या बदलामुळे नैसर्गिकरीत्या पडणाऱ्या हवामानावर या सर्व गोष्टींचा परिणाम होतो.
आम्ल पर्जन्य
गाड्या तसेच कारखान्यांमधील बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साईड वातावरणातील हवे सोबत मिळतात. हे वायू वातावरणामध्ये मिक्स झाल्यामुळे पावसाच्या वेळी आम्ल पर्जन्याच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पीक येत नाही पाणी आणि माती दूषित होते.
झाडांचे नुकसान
वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे याचा परिणाम थेट झाडांच्या वाढीवर दिसून येतो. आम्लपर्जन्य झाल्यामुळे हे पाणी झाडांवर पडते यामुळे झाडांची पाने गळण्यास सुरुवात होते. झाडांच्या नवीन येणाऱ्या रोपांवर सुद्धा याचा परिणाम होतो. जमीन नापीक झाल्यामुळे या ठिकाणी झाडे व्यवस्थित रित्या येऊ शकत नाहीत.
जंगलातील प्राण्यांवर होणारा परिणाम
अंटार्टिका मधील भागात बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढते. या वाढलेल्या पातळीमुळे अनेक प्राण्यांच्या जाती व प्रजाती यांना धोका निर्माण होतो. प्रदूषणामुळे आम्ल पर्जन्य होते. हे पाणी नद्या नाल्यांमध्ये मिसळल्यामुळे तेथील जल जीवन विस्कळीत होते.
माणसाला होणारे फुफुसाचे आजार
शरीरामध्ये श्वसनाच्या संबंधित जेवढे काही आजार आहेत त्याची मूळ कारण हे सध्याचे वाढते प्रदूषण हे आहे. मानव श्वास घेताना श्वासासोबत आजूबाजूच्या हवे सोबत दूषित हवा सुद्धा आपल्या नाकाद्वारे शरीरात येतो. या हवेमुळे माणसाला श्वसनाच्या संबंधित अनेक आजार होतात. यामध्ये फुफ्फुसांचा आजार, श्वास घेण्यासाठी होणारा त्रास, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होणे अशा प्रकारच्या अनेक आजारांचा समावेश आहे. (Hava pradushan in marathi)
हे पण वाचा : Jhade Lava Paryavaran Vachva : झाडे लावून आपण आपल्या पर्यावरणाचे कशाप्रकारे संरक्षण करू शकतो.