Plastic cha vapar kami karnyache upay benefits : प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, प्लास्टिकला पर्याय कोणता ?

Plastic cha vapar kami karnyache upay benefits : प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम,  प्लास्टिकला पर्याय कोणता ?
Plastic cha vapar kami karnyache upay benefits : प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, प्लास्टिकला पर्याय कोणता ?

Plastic cha vapar kami karnyache upay benefits : प्लास्टिक हे वर्षानुवर्षी पृथ्वीच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात साठवून राहते. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम असा होतो की हे प्लास्टिक नदी आणि नाल्यात पावसाच्या पाण्याद्वारे वाहून येते. पावसाच्या पाण्यासोबत वाहत आलेले हे प्लास्टिक समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्रात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे प्लास्टिक जमा होते. वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनावर या साठलेल्या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिकचा उपयोग करतो. एखाद्या गोष्ट साठवून ठेवणे असो.वस्तू साठवण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूंची आणण्यासाठी अशा बऱ्याच करण्यासाठी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.आज आपण

प्लास्टिकचा वापर कमी प्रमाणात कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच प्लास्टिक साठी कोण कोणते पर्याय सध्या उपलब्ध आहेत याचीही माहिती घेणार आहोत. प्लास्टिक हे  सभोवतालच्या परिसरात लवकर विघटित होत नाही. 

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रस्तावना

प्लास्टिकचा होणारा वापर हा पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे प्लास्टिकचा होणारा वापर हा कमी केला पाहिजे. प्लास्टिकचा होणारा मोठा प्रमाणात वापर आपण कमी करून आपल्या पर्यावरणाचे आपण संरक्षण करू शकतो. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पात्रांचा तसेच वस्तूंचा वापर केला जातो.या ऐवजी आपण झाडाच्या पानांनी बनलेल्या पात्रांचा जेवणासाठी वापर करून प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो. अशा अनेक प्रकारचे उपाय आहेत की ज्यांचा उपयोग करून आपण कमीत कमी प्रमाणात प्लास्टिक वापरून या पृथ्वीला वाचू शकतो.याची आपण सविस्तर मध्ये माहिती आज घेणार आहोत.

जे बायोडिग्रेडेबल गोष्टी आहेत म्हणजे ज्या सहजपणे आजूबाजूच्या मातीमध्ये बदलू शकतात अशा गोष्टींचा वापरा आपण कशाप्रकारे वाढू शकतो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा कचरा हा शेकडो वर्षे वातावरणामध्ये तसाच टिकून राहते याचे अनेक परिणाम  पृथ्वीतलावर राहणाऱ्या सजीवांना भोगावे लागतात.

आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचा कचरा साचून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे प्रदूषण होते. याला पर्याय म्हणून आपण प्लास्टिकचे वेगवेगळ्या प्रकारच्या विभाजन करू शकतो. यामध्ये प्राथमिक प्लास्टिक मध्ये आपण बाटलीचे झाकण आणि इतर जो कचरा असतो त्याचा समावेश करू शकतो.

जवळपास 45 ते 50 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा भारतामध्ये तयार होतो त्यापैकी जवळपास 40 ते 45 कचरा हा तसाच साठवून राहतो. त्यातील काही कचरा हा पॅकेजिंग साठी वापरला जातो. पण त्यातील काही प्लास्टिक एकदा वापरले की पुनर वापरता येत नाही. शक्यतो अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करणे टाळावे. (Plastic cha vapar kami karnyache upay benefits)

प्लास्टिकचे फायदे

प्लास्टिक अत्यंत स्वस्त किमतीत आपल्याला उपलब्ध होते. प्लास्टिक ही वजनाने हलके आणि वापरासाठी एकदम योग्य असे असते. त्यामुळे प्लास्टिकचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात. कोणत्याही प्रकारच्या वातावरणाचा परिणाम होत नाही. ते शेकडे वर्षे वातावरणामध्ये तसेच टिकून राहते. 

अनेक वैद्यकीय संसाधनांमध्ये प्लास्टिकचा उपयोग हा निर्जंतुक अति वापरला जातो. अनेक प्रकारचे हॉस्पिटलमध्ये वापरले जाणारे अवजारे हे प्लास्टिक पासून बनलेले असतात. जेणेकरून एकदा वापरल्यानंतर त्यांचा परत वापर केला जाणार नाही. गाड्या तयार करताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरले वापरले जाते. तसेच आपल्या दैनंदिन वापरात येणाऱ्या गरजेच्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी देखील मोठ्या प्रमाणात  प्लास्टिकचा वापर होत असतो.

हे सर्व जरी प्लास्टिकचे फायदे असले तरी प्लास्टिक वापरणे हे पर्यावरणास अत्यंत हानिकारक आहे. यासाठी पर्यायी मार्ग शोधून त्याचा अवलंब केला पाहिजे. जेणेकरून पर्यावरणाचे कमीत कमी प्रमाणात नुकसान होईल आणि प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. 

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम 

प्लास्टिकचा जास्त प्रमाणात वापर केल्यास याचा परिणाम माणसाच्या शारीरिक आरोग्यावर होत असतो. दैनंदिन जीवनामध्ये माणूस विविध प्रकारची अन्न हे प्लास्टिकच्या पॅकिंग मध्ये खात असतो. या पॅकिंग मध्ये वापरले जाणारे प्लास्टिक आपले अन्न दूषित करत असते. यामुळे अनेक प्रकारचे रोग होण्याची संभाव्यता मोठ्या प्रमाणात वाढत असते. जागतिक आरोग्य संघटनेने 2018 मध्ये केलेल्या संशोधनात प्लास्टिकचे मानवावर होणारे दुष्परिणाम उघड केलेले आहेत .

या संशोधनात असे आढळून आले की प्लास्टिकचा वापर केल्याने आपण आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य किती मोठ्या प्रमाणात धोक्यात टाकत आहे. 

प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा । Plastic waste management in marathi

प्लास्टिक वापराचा आणि त्यामधून तयार होणाऱ्या  कचऱ्याचा पर्यावरणावर  घातक परिणाम होत आहे.  प्लास्टिकच्या  बॅग आणि इतर कचरा नदी नाल्यांमध्ये अडकल्यामुळे पुरासारख्या मोठ्या संकटाला आपल्याला सामोरे जावे लागते. प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा परिणाम खालील प्रमाणे.

प्लास्टिक प्रदूषण : प्लास्टिकचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा तयार होतो. या  प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे योग्य  नियोजन केले नाही तर. नदी, नाले तसेच समुद्रामध्ये हे प्लास्टिक जाऊन अडकतात त्यामुळे जलप्रदूषण होते. प्लास्टिक हे जमिनीवर जास्त काळ टिकून राहिल्यामुळे मातीचे ही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. पाण्यावर तरंगणारे हे प्लास्टिक माशांना हानिकारक असते. त्यामुळे मोठ्या निर्माण होत असतात. 

प्लास्टिकचे विघटन होत असताना मोठे प्लास्टिक हे छोट्या तुकड्यांमध्ये विभागले जाते त्याला मायक्रो प्लास्टिक असे म्हणतात. हे प्लास्टिकचे लहान कण मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये मिसळतात. अन्नसाखळीत आणि मानवाच्या जीवनावर या प्लास्टिकच्या लहान तुकड्यांचा मोठ्या प्रमाणात म परिणाम होत असतो.(Plastic cha vapar kami karnyache upay benefits)

प्लास्टिक ला पर्याय कोणते आहेत | Plastic cha vapar kami karnyache upay benefits :

लग्न समारंभामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होतो.या प्लास्टिकच्या ऐवजी आपण जे पदार्थ वातावरणामध्ये सहज विघटित होतात यांच्या वापर करू. शक्यतो पेपर, झाडाची पाने  या प्रकारच्या पदार्थांपासून तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करून आपण पर्यावरणाला वाचू शकतो.

त्याचप्रमाणे ज्या प्लास्टिकच्या पॅकिंग मध्ये आपण वस्तू खात असतो किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्लास्टिकच्या बॅगांचा वापर करत असतो. या बॅगांच्या ऐवजी आपण पेपर पासून तयार केलेल्या बॅगांचा वापर करून प्लास्टिकचे प्रमाण कमी करू शकतो.

अशा प्रकारे प्लास्टिकला विविध पर्याय आजच्या जगामध्ये उपलब्ध आहेत. फक्त या पर्यायांचे सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोचवणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून लोक कमीत कमी प्रमाणात प्लास्टिक वापरून प्रदूषण कमी करतील.

हे पण वाचा : Blood Donation Benefits In Marathi : “रक्तदान हेच जीवनदान” रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी | रक्तदान करण्याचे फायदे

 

Leave a Comment