Sukanya Samriddhi Yojana In Marathi : “सुकन्या समृद्धी योजना 2023” या योजनेचे नाव तर तुम्ही ऐकले असेलच तर आज आपण “सुकन्या समृद्धी योजना” म्हणजे काय हे पाहणार आहोत सुकन्या समृद्धी योजनेची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केली. ही योजना मुलींना उच्च शिक्षण घेतेवेळी किंवा लग्नाच्या वेळी फायदेशीर ठरू शकते, या योजनेला “पंतप्रधान सुकन्या योजना” असेही म्हणतात. सरकार द्वारा बँक आणि पोस्ट ठेवी त्याच्या बऱ्याच योजना राबवल्या जातात त्याच्यापैकी ही एक योजना आहे.
“सुकन्या समृद्धी योजना” या योजनेच्या अनुसार मुलीच्या आई-वडिलांकडून पोस्ट ऑफिस मध्ये किंवा एखाद्या बँक मध्ये मुलीच्या नावाने खाते उघडून या योजनेचा लाभ घेता येतो. अशा प्रकारच्या उघडलेल्या खात्यात सुकन्या समृद्धी खाते असे म्हणतात. हे सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी अडीचशे रुपये ते दीड लाख रुपयांपर्यंत पैसे भरून गुंतवणूक करता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “बेटी बचाओ बेटी पढाओ” या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची स्थापना झाली आहे. आता आपण Sukanya Samriddhi Yojana In Marathi ची संपूर्ण माहिती सविस्तरपणे घेवू .
Sukanya Samriddhi Yojana Highlights
- योजना : सुकन्या समृद्धी योजना
- स्थापना : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- लाभार्थी : भारतातील मुली
- लाभ : मुलींना उच्च शिक्षण घेतेवेळी किंवा लग्नाच्या वेळी फायदेशीर
- योजनेअंतर्गत : बेटी बचाओ बेटी पढाओ
- स्थापना : 22 जानेवारी 2015
- अर्ज : बँक आणि पोस्ट ऑफिस
Sukanya Samriddhi Yojana In Marathi नवीन अपडेट 2023
- सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत कुटुंबातील फक्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत होत्या पण सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे या योजनेचा लाभ कुटुंबातील तीन मुली लाभ घेऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
- सुकन्या समृद्धी योजनेच्या ठेवीवर आयकर विभागाच्या कलमानुसार सूट मिळते.
- मुलीला अठरा वर्षे झाल्यानंतर तुम्ही गुंतवणूक या ठेवीतील 50 टक्के रक्कम शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काढू शकता.
- या योजनेअंतर्गत मुलींचे भविष्य सुरक्षित होते.
- जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजदर जमा होतो.
- देशातील प्रत्येक मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते व आपल्या भविष्य उज्वल बनवू शकते.
- एखाद्या मुलीला दत्तक घेतल्यास किंवा ती अनाथ असल्यास या योजनेचा लाभ तुम्ही येऊ शकता.
- योजनेअंतर्गत सरकारकडून आपल्याला आपल्या गुंतवणुकीच्या पैशांवर चांगल्या व्याजदराची हमी मिळते.
- एखाद्या अधिकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण खाते काढू शकता.
सुकन्या समृद्धि योजना चे नुकसान
- या योजनेचा कालावधी खूपच जास्त आहे सुमारे तो 21 वर्षे एवढा असतो.
- योजनेमध्ये तुम्ही वर्षाला फक्त दीड लाख रुपये गुंतवणूक करू शकता यापेक्षा जास्त गुंतवणूक तुम्ही करू शकत नाही.
- या योजनेमध्ये तुम्ही जेवढे पैसे गुंतवणूक करतात तेवढे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला जास्त रिटर्न मिळू शकतो तो 7.6% यापेक्षा जास्त असू शकतो.
- मुलीची वय 21 वर्षे पूर्ण व्हायच्या आत या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही.
- जर मुलीच्या शिक्षणासाठी तुम्हाला 21 वर्षाच्या आत पैशांची गरज असेल तर या योजनेतून तुम्ही पैसे काढू शकत नाही.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी
- गुंतवणूक करण्यापासून ते लाभ मिळवण्याचा कालावधी हा 21 वर्षे आहे त्याआधी तुम्ही गुंतवणुकीतून पैसे काढू शकत नाही.
- जर मुलीने 21 वर्षाच्या आत लग्न केले तर सुकन्या समृद्धी खाते आपोआप बंद पडते.
- दरवर्षी तुम्हाला किमान 250 रुपये खात्यात जमा करायचे आहेत अन्यथा तुमचे खाते बंद पडू शकते.
- जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना संपूर्ण रक्कम व्याजासहित मिळते.
- दहा वर्षानंतरच्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते बंद होऊन या योजनेची रक्कम तुम्हाला दिली जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी भारतीय असणे आवश्यक आहे.
- फक्त मुलीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.(Sukanya Samriddhi Yojana In Marathi)
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर
Sukanya Samriddhi Yojana In Marathi व्याजदर
- एप्रिल – २०१४- ९.१ टक्के
- एप्रिल – २०१५- ९.२टक्के
- एप्रिल – २०१६ पासून जून- २०१६ – ८.६ टक्के
- जुलै २०१६ पासून सप्टेंबर २०१६ – ८.६ टक्के
- ऑक्टोबर २०१६ पासून डिसेंबर २०१६ – ८.५ टक्के
- जुलै २०१७ पासून डिसेंबर २०१७ – ८.१ टक्के
- जानेवारी २०१८ पासून मार्च २०१८ – ८.१ टक्के
- एप्रिल २०१८ पासून जून २०१८ – ८.१ टक्के
- जुलै २०१८ पासून सप्टेंबर २०१८ – ८.१ टक्के
- ऑक्टोबर २०१८ पासून डिसेंबर २०१८ – ८.५ टक्के
- जानेवारी २०१९ पासून मार्च २०१९ – ८.५ टक्के
- एप्रिल २०२० पासून जून २०२०- ७.६ टक्के
- जानेवारी २०२१ पासून २०२२ डिसेंबर – 7.6 टक्के
- जानेवारी २०२२ पासून २०२३ चालू – 7.6 टक्के.
सुकन्या समृद्धि योजना age limit
- सुकन्या समृद्धी योजना लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे दहा वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे मुलीचे आई-वडील मुलगी जन्मल्यापासून ते दहा वर्षापर्यंत या योजनेसाठी अप्लाय करू शकतात.
- मुलीचे वय दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकीची पूर्ण ठेवा आपल्याला परत मिळते त्या आधी आपण गुंतवणुकीतील पैसे काढू शकत नाही. (Sukanya Samriddhi Yojana In Marathi)
सुकन्या समृद्धि योजना 1000
- जर तुम्ही नवीन खाते उघडल्यापासून तुम्ही पंधरा वर्षे प्रत्येक महिन्याला हजार रुपये जमा केल्यास 21 वर्षानंतर तुम्हाला पाच लाख 58 हजार 407 रुपये एवढे रक्कम मिळेल यात व्याजदर आठ टक्के पकडला आहे.
सुकन्या समृद्धि योजना पोस्टऑफिस फॉर्म
- जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले खाते चालू करायचे आहे.
- पोस्ट ऑफिसच्या फॉर्म सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओपन करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 250 रुपये भरावे लागतील.
- पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे खाते ओपन केल्यानंतर तुम्हाला एक पासबुक दिले जाईल त्या पासबुक मध्ये आपल्याला पुढील वीस वर्षे पूर्ण होईपर्यंत पैसे जमा करायचे आहे.
- जेव्हा आपला ठरलेला कालावधी पूर्ण होईल तेव्हा जमा झालेली गुंतवणूक आपणास परत देण्यात येईल.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडायची पद्धत
- सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म साठी जवळच्या अधिकृत बँकेत आपल्याला जायचे आहे.
- दिलेला फॉर्म योग्य पद्धतीने भरून त्या फॉर्म सोबत योग्य ती कागदपत्रे लावून बँकेत द्यायची आहेत.
- तुम्ही हा फॉर्म कागदपत्रांसोबत बँकेत जमा केल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि आपल्याला पासबुक ओपन करून दिले जाईल.
- या योजनेअंतर्गत खाते ओपन करण्यासाठी कमीत कमी अडीचशे रुपये भरणे अनिवार्य आहेत.
- अशा पद्धतीने आपण सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट बँकेत ओपन करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- सुकन्या समृद्धी योजनेचे प्रमाणपत्र म्हणजेच भरलेला फॉर्म.
- लाभार्थ्यांचा जन्म दाखला.
- पॅन कार्ड.
- आधार कार्ड.
- मतदान कार्ड ओळखपत्रासाठी.
- रेशन कार्ड आणि विज बिल.
- मुलीचा पासपोर्ट साईज फोटो.
वरील सर्व दिलेले कागदपत्रे ही मुलीच्या आई-वडिलांची असावीत. (Sukanya Samriddhi Yojana In Marathi)
Sukanya Samriddhi Yojana In Marathi विचारले जाणारे प्रश्न
१. तुम्ही 15 वर्षांसाठी सुकन्या योजनेत ₹ 1000 जमा केल्यास, तुम्हाला 18 वर्षांत किती पैसे मिळतील ?
उत्तर : या योजनेत खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील 15 वर्षांपर्यंत तुम्ही दरमहा 1000 रुपये जमा केल्यास, 21 वर्षांनंतर तुम्हाला 5 लाख 58 हजार 407 रुपये प्रतिवर्षी 8% व्याजदराने वेळ पूर्ण झाल्यावर मिळतील.
२. सुकन्या समृद्धी योजनेत किती काळ पैसे जमा करावे लागतील ?
उत्तर : सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा करण्याचा काळ 15 वर्ष आहे म्हणजेच तुम्ही तुमची मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर गुंतवणूक वरील पैसे परत मिळतील.
३. आपण एका वर्षात सुकन्या योजनेत किती वेळा पैसे जमा करू शकतो ?
उत्तर : तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात एकतर आर्थिक वर्षातून एकदा किंवा लहान, नियमित हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता. खाते चालू ठेवण्यासाठी, तुम्हाला वर्षात किमान 250 रुपये भरावे लागतील आणि 15 वर्षांच्या आत हे पैसे काढू शकत नाही.
४. मी सुकन्या समृद्धी मध्ये 10 लाख जमा करू शकतो का ?
उत्तर : तुम्ही एका वर्षात फक्त दीड लाख रुपये जमा करू शकता.
५. सुकन्याचे खाते कोणत्या बँकेत उघडावे ?(Sukanya Samriddhi Yojana In Marathi)
उत्तर : या योजनेअंतर्गत खाते उघडण्याची सुविधा SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.
६. मी माझे सुकन्या समृद्धी खाते बंद करू शकतो का?
उत्तर : सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्याच्या पासून २१ वर्षे पूर्ण झाल्यावर परिपक्व होते. लाभार्थ्याच्या लग्नामुळे खाते मुदतीपूर्वी बंद करणे देखील शक्य आहे.