IMD Alert : येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. सकाळपासून राज्याच्या विविध भागांमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे संपूर्ण भाग तापून निघालेला होता. तेवढ्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात ढग दाटुन आलेले आहेत, आणि येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने जारी केलेला आहे. पाऊस पडण्यासाठी वातावरणामध्ये अनुकूल विषयी परिस्थिती तयार झालेली आहे
उत्तर पश्चिम भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला थंडी पाहायला मिळत आहे. तर काही भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे
या संपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयएमडी (IMD Alert) म्हणजेच हवामान विभागाने येत्या दोन तासात मुसळधार पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी वर्तवलेला आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता देण्यात आलेली आहे.
आय एम डी अलर्ट (IMD Alert) देताना नुकतेच जारी केलेले 25 ते 28 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ या भागांमध्ये आयएमडी अलर्ट(IMD Alert) जारी करण्यात आलेला आहे.
येत्या 24 तासाचा हवामान अंदाज
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ताशी 17 ते 18 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. राज्यातील कोकणात तापमान 37 अंश सेल्सिअस तर ठाणे व रत्नागिरीच्या परिसरात 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहील. मुंबईमध्ये समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळेल.