IMD : राज्यात येणार Cyclone Tej चक्रीवादळ पाऊस कोसळणार का? दसऱ्यानंतर या भागात पडणार अति मुसळधार पाऊस

IMD : राज्यात येणार Cyclone Tej चक्रीवादळ पाऊस कोसळणार का?
IMD : राज्यात येणार Cyclone Tej चक्रीवादळ पाऊस कोसळणार का?

IMD :  परतीचा मान्सून गेल्या दोन दिवसापासून देशातून गेलेला आहे. वेगळ्या भागांमध्ये यंदा मान्सून परतल्यानंतर आता अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेले आहे. या चक्रीवादळमुळे महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या पावसावर काय परिणाम होणार आहे याची आता आपण माहिती घेणार आहोत. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रवर होणारा परिणाम  IMD ने जारी केलेला आहे.  

यावेळी राज्यात चांगला पाऊस झालेला नाही.यंदा राज्यामध्ये सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झालेला आहे. चार वर्षानंतर राज्यात एकूण पावसाच्या तुलनेत कमी पाऊस झालेला आहे. मान्सून परतल्यानंतर राज्यामध्ये आता चक्रीवादळाची संकट तयार झालेले आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये हे वादळ तयार झाले आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या भागात सर्वत्र वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेले आहे. या चक्रीवादळाला तेज चक्रीवादळ असे नाव देण्यात आलेले आहे.  IMD ने दिलेल्या हवामान अंदाजानुसार याचा परिणाम काय होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत

26 ऑक्टोबर नंतर हे तयार झालेले चक्रीवादळ अरबी समुद्रातून व ओमानच्या दिशेने जाणार आहे. दक्षिण पाकिस्तान मध्ये हे वादळ जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या चक्रीवादळाचा भारतीय हवामानावर कोणता परिणाम होणार याबद्दल हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलेले आहे. हे चक्रीवादळ  दक्षिण  बंगालच्या दिशेने  जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते ओमन कडे जाणार आहे या चक्रवादाचा परिणाम महाराष्ट्रभर होणार नाही.

उद्याचे हवामान | IMD लाईव्ह हवामान अंदाज

IMD उद्या पुण्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, तर काही ठिकाणी  सूर्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये उद्या वाढ होताना आपल्याला दिसेल. उद्याचे तापमान हे 35 अंश सेल्सिअसच्या जवळपास जाण्याचा अंदाज आहे. 

आंध्रा मध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. 23 ऑक्टोबर पर्यंत पश्चिम आणि मध्य बंगालच्या उपसागरात तेच चक्रीवादळ दाखल होणार आहे. या चक्रीवादळाची तीव्रता जास्त असणार आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ ओडिशा आणि बंगालच्या दिशेने जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुख्य करून या चक्रीवादळाचा फटका ओडिशाला आणि आंध्र प्रदेश या भागांना बसणार आहे.

IMD : पुढील दोन दिवसात या भागांमध्ये पडणार मुसळधार पाऊस कमी दाबाचा पट्टा होणार सक्रिय

Leave a Comment