IMD : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी अति मुसळधार पाऊस झाला होता. पण आता तेथील पाऊस थोडा शांत झाला आहे. पुणे आणि मुंबईमध्ये येत्या 24 तासांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणची पश्चिम किनारपट्टी मध्ये मुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. कोकणाच्या उत्तर दिशेत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे म्हणून आज कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.