Goa Monsoon 2023 : भारतीय हवामान विभागाने गोव्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. गुरुवारी मुसळधार पाऊस होणार असल्याकारणाने राज्य सरकारने गुरुवारी गोव्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हा निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे.
हे पण वाचा : Maharashtra Monsoon Today : पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस ?
Goa Monsoon 2023 । अति मुसळधार पावसामुळे गोव्यातील शाळांना सुट्टी जाहीर
गोव्यामध्ये शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केलेली आहे. प्रसाद लोलयेकर शिक्षण सचिव यांनी ही माहिती दिली. ज्या संस्थेमध्ये परीक्षा सुरू आहेत तेवढेच वर्ग सुरू राहतील असे शिक्षण सचिवांनी सांगितले आहे. परीक्षा असलेल्या ठिकाणी सुट्टी मिळणार नाही असा निर्णय सरकारने उशिरा कळवला आहे.
भारत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बुधवार प्रमाणे गुरुवारी देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी उत्तर आणि दक्षिण गोव्यात वारे वाहू लागले या वाऱ्यांचा वेग 50 किलोमीटर इतका होता. हवामान खात्याने गोव्याला रेड अलर्ट जारी केला होता.
सहा जुलै रोजी दक्षिण आणि उत्तर गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज वेधशाळेने दिलेला आहे. पुढच्या तीन दिवसात सात ते नऊ जुलै पर्यंत राज्यात काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज IMD दिलेला आहे.
हे पण वाचा : Weather Alert : या पाच जिल्ह्यांमध्ये आज होणार मुसळधार पाऊस