Weather Alert : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार काही जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे. जुलै महिना सुरू झाला तसा पाऊस सुरू झाला व हवामान अंदाजानुसार पुढील चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस सांगितला होता. तसा पाऊसही सुरू आहे. राज्य सर्वत्र चांगला पाऊस पडलेला आहे. पण आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. कोणत्या भागात येलो अलर्ट आहे व ऑरेंज अलर्ट आहे हे आपण पाहणार आहोत. हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्या अंदाजानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा : Gold Rate Today Pune : ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू कारण सोन्याच्या किमतीत झाली घट
या पाच जिल्ह्यात पडणार मुसळधार स्वरूपाचा पाऊस | Weather Alert
कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच ठाणे आणि पुण्याच्या काही भागात हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केला आहे.
जून महिन्याच्या शेवटी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच पुण्याच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पुणे आणि मुंबईमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याचा आहे .
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता पुढील तीन दिवसात आहे. याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भात आणि मराठवाड्यात दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो.
हे पण वाचा : Maharashtra Monsoon Today : पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस ?