IMD Weather Update: विदर्भात मिळाला पावसाचा येल्लो अलर्ट तर मुंबईमध्ये बरसू लागल्या पावसाच्या सरी.

IMD Weather Update: विदर्भात मिळाला पावसाचा येल्लो अलर्ट तर मुंबईमध्ये  बरसू लागल्या पावसाच्या सरी.
IMD Weather Update: विदर्भात मिळाला पावसाचा येल्लो अलर्ट तर मुंबईमध्ये बरसू लागल्या पावसाच्या सरी.

IMD Weather Update: ऑगस्ट महिना चालू झाला तसा पाऊस दडी मारून बसलेला होता. राज्याच्या बहुतांशी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक प्रमाणात पाऊस पडत होता. परंतु काही दिवसापूर्वी हवामान विभागाने पावसाचे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आगमन होईल असा अंदाज दिला आहे.  राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला तर काही भागात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला होता.

हवामान अंदाज मराठवाडा आज live 

ऑगस्टमधील पावसाच्या अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा भागातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आनंदाची बातमी दिलेली आहे. या नवीन अंदाजानुसार पुढील एक ते दोन दिवस मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. गुरुवारी मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आपल्याला पाहायला मिळाली.

हे पण वाचा : Maharashtra Rain Update: पुन्हा एकदा महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस; येत्या 48 तासात हवामान अंदाज

आज पाऊस पडेल का महाराष्ट्र | IMD Weather Update

IMD Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑगस्ट च्या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुरळक पाऊस पडणार असा अंदाज दिलेला होता. त्यानंतर आता ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज दिलेला आहे. यामुळे पावसाचे आगमन कधी होणार यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Mumbai weather forecast: भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार पडणार आहे. लवकरच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा कमबॅक होणार आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यात पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मुंबई आणि इतर भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.  

हे पण वाचा : India Meteorological Department : उद्याचे हवामान, राज्यात या भागात पडणार अति मुसळधार पाऊस.

Leave a Comment