IMD weather update | अवकाळी पावसाचा मुक्काम आता राज्यात आणखीन वाढलेला आहे.

IMD weather update
IMD weather update

 

IMD weather update:

IMD हवामान अंदाजानुसार  पावसाचा थैमान 15 एप्रिल पर्यंत तसाच राहणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊसमुळे अनेक भागात गारपीट पहायला मिळेल. या मध्ये राज्यातील अनेक भागातील पिकांचे अवकाळी पाऊसचं आगमन आणि गारपीट यामुळं मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते.

भारतीय हवामान विभागाने येत्या 24 तासात अनेक ठिकाणी पाऊसचा अंदाज वर्तवलेला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिलेला आहे. बीड, लातूर,सांगली, परभणी, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर व सोलापूरात वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

बुधवारी सायंकाळनंतर बीड, अकोला, बुलडाणा, परभणी जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली.  नागपुरात गुरुवारी पावसाच्या सरी कोसळल्या.  दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगाळ झाले आहे.  अवकाळी पावसामुळे विदर्भात कमाल तापमानात घसरण सुरू आहे.  आज, शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, तर मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.  दरम्यान, उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

या हवामान अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये .

 

Leave a Comment