IMD Weather Update : गेल्या महिन्यात पाऊस दडी मारून बसलेला होता.पण आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाची महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दमदार एन्ट्री झालेली आहे.आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशात आजपासून पुढील काही दिवसात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.(India Meteorological Department)
आज पाऊस पडणार आहे का 2023 | Today Weather Update
दिनांक 28 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत हवामान विभागाने गोवा, मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य सह देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हा पाऊस राजस्थान, गोवा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये दाट स्वरूपात पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.
कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा या भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल गुजरात आणि मध्य प्रदेशात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
उद्याचे हवामान | आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र
Today IMD Weather Update : मुंबई आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. मुंबई आणि इतर परिसरामध्ये विजांच्या कडकडाट सुरू झालेला आहे. तर राज्याच्या इतर भागांमध्ये मध्यम ते तर तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे.औरंगाबाद, सातारा, नांदेड, लातूर या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळेल. सोलापूर,जालना, हिंगोली, बीड तसेच परभणी या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
IMD Weather Update Mumbai | India Meteorological Department
IMD Weather Update Mumbai : ठाणे, मुंबई आणि रायगड तसेच पालघर या भागांना हवामान विभागाचा येल्लो जारी झालेला आहे. रत्नागिरी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरातील परिसरात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड या भागात येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.
त्याचबरोबर हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशाच्या विविध भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.कर्नाटकामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र
परतीच्या पावसाची महाराष्ट्रमध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार हजेरी आहे. नैऋत्य मोसमी पाऊस परतीच्या स्वरूपात येणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज जारी केलेला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार होणार आहे. 29 सप्टेंबर पासून पूर्व भारतात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा : Weather Update : पंजाब डख हवामान अंदाज today | येत्या 48 तासात हवामान अंदाज