Jhade Lava Paryavaran Vachva : झाडे लावून आपण आपल्या पर्यावरणाचे कशाप्रकारे संरक्षण करू शकतो.

Jhade Lava Paryavaran Vachva
Jhade Lava Paryavaran Vachva

Jhade Lava Paryavaran Vachva : झाडे लावा झाडे जगवा निबंध (Plant trees save earth) आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. झाडाचे उपयोग, झाडे लावण्याची फायदे अशा अनेक गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत.आज आपण मोकळ्या हवेमध्ये श्वास घेत आहे किंवा थंड हवेचा अनुभव घेत आहे. त्या सर्वाचे कारण म्हणजे पृथ्वीवर असणारी झाडे आहेत.माणसाच्या मूलभूत गरजा या निवारा, अन्न, वस्त्र आहेत. माणसाच्या मूलभूत गरजा देखील आपण झाडाकडूनच पूर्ण होतात. पण सध्याच्या जगात आपण पाहत आहोत की झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. या सर्व गोष्टींचे परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर आणि पृथ्वीच्या वातावरणावर होताना आपल्याला दिसत आहेत. 

Jhade Lava Paryavaran Vachva हा संदेश खूप  मुलाचा आहे. झाडे लावल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. झाडे लावणे किती गरजेचे आहे हे आपण पाहणार आहोत. 

झाडांची माहिती मराठी | Zade lavnyache fayde in marathi uses 

वृक्ष ही माणसाची मित्र आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्या अनेक संतांनी आणि थोर विचारवंतांनी झाडे किती महत्त्वाची आहेत याबद्दल अनेक अभंग तसेच पुस्तके लिहिलेली आहेत. या सर्व गोष्टींवरून आपल्या लक्षात येते की पृथ्वीच्या वातावरणाचा समतोल राहण्यासाठी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांची किती आवश्यकता आहे. 

त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे आणि त्याचे संगोपन करून त्याला मोठे केले पाहिजे. आजकाल घर बांधण्यासाठी शेती करण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या कारणांसाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. आपल्या अवतीभोवती असणारी झाडे आपले नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण करतात. माणसाचे जीवन सुरक्षित बनवतात. सध्या वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. ते प्रदूषण कमी करण्यासाठी झाडांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्वांनी झाडे लावून पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. 

झाडाचे महत्व | झाडाचे उपयोग

  • माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सीजन अत्यंत महत्त्वाचा आहे. एक मिनिटं ऑक्सिजन नाही घेतला तर माणूस जिवंत राहू शकत नाही. हाच ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून फुकटात मिळत असतो. या ऑक्सिजनची माणसाला किंमत राहिलेली नाही. एखादा माणूस आजारी असेल तर दवाखान्यात गेल्यानंतर त्याला तो ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. हा ऑक्सिजन झाडे आपल्याला फ्री मध्ये देतात. त्यामुळे झाडांची होणारे तोड आपण कमी करू शकतो. वातावरणात असणारे ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल आणि मानव स्वच्छ हवेमध्ये श्वास घेऊ शकेल. 
  • झाडे लावल्यामुळे त्यांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणात वादळ आल्यानंतर जमिनीवरील माती उडून जात नाही. त्यामुळे झाडे माती जपण्याची सुद्धा काम करतात. अशा प्रकारे झाडांची अनेक फायदे आहेत. हे सर्व फायदे लक्षात घेऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावले पाहिजे. 
  • ज्या ठिकाणी झाडे मोठ्या प्रमाणात असतात त्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करतात आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या तसेच आम्ल वर्षा अशा अनेक संकटांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यास झाडे मदत करतात.
  • ज्या ठिकाणी झाडे दाट प्रमाणात असतात त्या ठिकाणी उन्हाळा आणि पावसाळा या दोन्हींवर नियंत्रण राहते.
  • अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम झाडे करत असतात. पूर्वीपासून झाडे आणि माणसांमध्ये  एक  घट्ट नाते आहे.  झाडाची माणसाला दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतात. झाडापासून फुले, फळे, लाकूड, औषधे  अशा अनेक प्रकारच्या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम झाडांमुळे होते.
  • झाडे आपले उन्हापासून संरक्षण करतात. अनेक प्रकारचे पक्षी झाडावर घरटी बांधून राहतात. प्राणी झाडांचा निवारा म्हणून उपयोग करतात. पण सध्याच्या आधुनिक जगामध्ये माणूस आपल्या स्वतःसाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील झाडांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे.

आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले पाहिजे. झाडांमुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि आपल्या पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण होईल. (Jhade Lava Paryavaran Vachva)

घरासमोर कोणती झाडे लावू नये

आपल्या घरात काटेरी झाडे लावू नये. काटेरी झाडे लावल्यामुळे हे काटे आपल्याला इजा करू शकतात. तसेच अनेक प्रकारच्या काटेरी झाडांमुळे आजार उद्भवण्याचा सुद्धा धोका राहतो. घरामध्ये निवडुंग मिळवल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे लावल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला समोर जावे लागते. 

झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे का आवश्यक आहे? 

झाडे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण कमी करतात. झाडांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साइडची मोठ्या प्रमाणात गरज असते. तरी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे त्यांचे अन्न तयार करण्याचे काम करत असतात. या संपूर्ण प्रक्रियेद्वारे मध्ये झाडे ऑक्सिजन बाहेर टाकतात. हा ऑक्सिजन मानवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जेवढ्या प्रमाणात आपण जास्त झाडे लावू तेवढ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग कमी होणे शक्य आहे.

झाडे लावा झाडे जगवा म्हणजे काय?(Jhade Lava Paryavaran Vachva)

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी आपण शाळेमध्ये असताना लिहिलेला आहे. मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम झाडे करत असतात. त्यामुळे झाडाचे महत्व माणसाच्या आयुष्यात खूप जास्त आहे. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा असे घोषवाक्य आपण कायम म्हणत असतो. याचा अर्थ असा आहे की आपण जर आज झाडांना वाचवले तर उद्या झाडे आपल्याला वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी करून आणि ऑक्सिजन बाहेर टाकून आपल्याला वाचवणार आहेत. 

 

Leave a Comment