Kisan Drone Yojana : केंद्र सरकार हे भारतातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते यामध्ये शेती आणि शेतीच्या संबंधित अनेक योजना असतात पण या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. योजनेसाठी पात्र असून सुद्धा ते लोक या योजनेचा फायदा घेत नाहीत. तर आज मी तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहे, यामध्ये केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांना औषध फवारणी साठी ड्रोन देणार आहे. पारंपारिक पद्धतीमध्ये शेतकरी आपल्या पाठणीवर पंप घेऊन शेतात औषध फवारणीचे काम करायचा. त्यामध्ये ते औषध अंगावर सांडून त्वचेचे अनेक प्रकारचे गंभीर आजार व्हायचे. यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा व्हायचा. हे सगळे होऊ नये व सर्व पिकांवर योग्य प्रमाणात फवारणी व्हावी यासाठी भारत सरकारने Kisan drone yojana अमलात आणली आहे.
आज आपण पाहणार आहोत की या योजनेचा फायदा आपण कशाप्रकारे घेऊ शकता. याचा अर्ज कसा करायचा याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. पात्रता काय आहेत. याबद्दलची सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम केंद्र सरकारने एक शेतकरी एक ड्रोन वाटण्याचा निर्णय घेतला होता पण तो रद्द करून आता वैयक्तिक ड्रोन घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. यामध्ये तुम्ही शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करू शकता शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना आपला व घातक औषधांचा काहीही संबंध येणार नाही त्यामुळे आपण सुरक्षित ठिकाणी उभे राहून आपल्या पिकांवर आधुनिक पद्धतीने फवारणी करू शकता.अशा प्रकारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. (drone subsidy in maharashtra)
kisan drone yojana highlights
- योजना : kisan drone yojana योजना
- लाभार्थी : भारत देशातील सर्व शेतकरी
- साल : 2023
- विभाग : कृषी विभाग
- अनुदान : ५ लाखाचे अनुदान
- योजनेचा उद्देश : agriculture drone sprayer खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
kisan drone yojana उद्देश्य
kisan drone yojana purpose
- भारत देशातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणे.
- शेतामधील कामाचा वेग वाढवणे.
- शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अथवा पाच लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देणे.
- शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतावर कीटकनाशके, खते फवारणी करू शकतात .
- शेतकऱ्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षित अंतरावर उभे राहून औषध फवारणी करता येऊ शकते.
- औषध फवारणी करताना शेतकऱ्यांना त्वचेचे आजार तसेच विष बाधेचा धोका होणार नाही.
Kisan Drone Yojana मिळणारे अनुदान
Krushi drone anudan yojana price
- एसीएसटी व अल्पभूधारक शेतकरी आणि महिला : ५०% किंवा जास्तीत जास्त ₹५००००
- बाकीच्या उरलेल्या शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा जास्तीत जास्त : ₹४०००००
- किसान उत्पादक संघटना (FPO) साठी मिळणारे अनुदान : ७५ टक्के
- कृषी मान्य असलेली संस्था व कृषी संशोधन केंद्र : 100% अनुदान मिळणार
kisan drone yojana वैशिष्ट्ये
kisan drone yojana Features
- भारत देशातील आधुनिक शेती करण्यासाठी वाटचाल या योजनेच्या माध्यमातून करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- शेतीसाठी फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाईल.
- या योजनेच्या माध्यमातून शेतीवर व पिकावर पडणाऱ्या कीटकांचा व रोगराईंचा नाही नायनाट करण्याचा प्रयत्न या योजनेमार्फत होणार आहे.
- एका सुरक्षित ठिकाणी उभे राहून शेतकरी आपल्या पिकांवर आधुनिक पद्धतीने औषध फवारणी करू शकतो.
- शेतकऱ्यांची जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न या योजनेमार्फत केला जातो.
- शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे व शेतीमध्ये त्यांच्यात आवड निर्माण करण्याचा प्रयत्न या योजनेत केला जात आहे.
- शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास तसेच आधुनिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे .
- शेतात होणारे काम जलद गतीने पूर्ण होणार आहे.
- आधुनिक यंत्र ज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त शेतीमध्ये उत्पन्न मिळणार आहे.
kisan drone yojana लाभार्थी
kisan drone yojana Beneficiary
- ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकरी हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजनेची रक्कम जमा करण्यासाठी अधिकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- याआधी शेतकऱ्याने घरी या योजनेचा लाभ घेतला असेल तर तो दुसऱ्यांदा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला एकदाच लाभ घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याला 50% ते पाच लाख रुपये पर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.
- फक्त शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण व रिमोट तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेला शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
kisan drone yojana लाभ (Benefits)
- आधुनिक शेती करण्यासाठी ड्रोन खरेदीसाठी सरकार अनुदान देणार आहे.
- या योजनेअंतर्गत कृषी पदवीधारकांना सरकार पाच लाखापर्यंत अनुदान उपलब्ध करून देणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी दहावी उत्तीर्ण तसेच रिमोट कंट्रोल तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- आधुनिक पद्धतीतील शेतीकडे वाटचाल करून उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.
- फवारणी करताना घातक औषधांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार आहे.
- ड्रोन मुळे शेती कामांमध्ये सुधारणा होणार आहे.
- त्वचेच्या घातक आजारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार आहे.
- पाठीवरच्या पंपामध्ये औषध मारताना शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावे लागत होती ती आता कमी होणार आहे.
- औषधाचा पंप घेण्यासाठी आता आर्थिक अडचणीसाठी कर्ज काढण्याची गरज पडणार नाही.
- खूप कमी किमती शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन मिळणार आहे.
kisan drone yojana पात्रता
kisan drone yojana Eligibility
- भारत देशातील रहिवासी शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
- योग्य ती कागदपत्रे अर्ज करण्यासाठी असणे आवश्यक आहे .
- कृषी संसाधने भारतातील शेतकरी, कृषी पदवीधर , कृषी संशोधन केंद्र, किसान एफ पी ओ योजने अंतर्गत असणारे शेतकरी योजनेचा फायदा घेऊ शकतात.
kisan drone yojana अटी (Terms And Condition)
- दहावी उत्तीर्ण असणे व रिमोट कंट्रोल तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेलाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.
- योग्य ती कागदपत्रे अर्ज करण्यासाठी असणे आवश्यक आहे .
- कृषी अवजारांच्या संबंधित या आधी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे.
- भारतीय सरकार विभागात असलेले लोक या योजनेत सामील होऊ शकत नाही म्हणजेच सरकारी कर्मचारी.
- शेतकरी असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
kisan drone yojana कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी धाकला
- स्वतःचा मोबाईल नंबर आणि ई-मेल
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- खरेदी करावयाच्या ड्रोन चे कोटेशन/दुकानदाराची संपूर्ण माहिती
- संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
- अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण प्रमाणपत्र
- संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
- अधिकृत बँकेत खाते
- अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
- स्वयं घोषणापत्र
- पूर्व संमती पत्र
वरील दिलेली सर्व कागदपत्रे आपण आपल्या अर्जासोबत जोडायची आहेत.
Krushi drone anudan अर्ज कसा करावा
- अर्ज करण्यासाठी आपल्याला जिल्हा कार्यालयाच्या कृषी केंद्रात जावे लागेल.
- कृषी कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे कृषी ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- या अर्ज तुम्ही विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरायची आहे आणि वरती दिलेली कागदपत्रे त्याला सोडायची आहेत.
- जोडलेल्या कागदपत्रांसह भरलेला फॉर्म अधिकार्यांजवळ द्यायचा आहे.
- आता तुमच्या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी केल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
- अशा पद्धतीने तुम्ही कृषी ड्रोन योजनेसाठी अर्ज करू शकता.
किसान ड्रोन प्राइस (agriculture drone sprayer price in india)
कमी किमतीसह पहा तीन प्रकारचे ड्रोन :
- एस 550 स्पीकर ड्रोन – या ड्रोन मध्ये जवळपास दहा लिटर औषध फवारणी करण्याची क्षमता आहे. याचा सेंसर खूप शक्तिशाली आहे एखादा अडथळा मध्ये आला तर ते आपल्याला लगेच सूचित करतात. या ड्रोनची किंमत सुमारे 4.5 लाख एवढी आहे.
- मोड 2 कार्बन फाइबर कृषि ड्रोन – या ड्रोनची किंमत 3.5 लाख एवढी आहे. एका वेळेला हे ड्रोन जवळपास दहा लिटर औषध घेऊन शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे .
- केटी-डॉन ड्रोन– या ड्रोन ची क्षमता दहा लिटर पासून ते 100 लिटर पर्यंत आहे. हा ड्रोन खूप शक्तिशाली आहे . या ड्रोन मध्ये क्लाऊड इंटेलिजंट मॅनेजमेंट तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे. या ड्रोनची किंमत तीन लाखाच्या पुढे आहे.
ड्रोन उडवताना घ्यायची काळजी (drone safety and precaution)
शेतकऱ्यांना ड्रोन उडवण्यासाठी हाय टेन्शन लाईन अथवा मोबाईल टॉवरच्या ठिकाणी ड्रोन उडवण्यासाठी शासनाची अनुमती असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात राहतात त्याच्याजवळ ड्रोन काळजीपूर्वक चालवणे आवश्यक आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या भागात फवारणी करायची असेल तर त्या संबंधित अनुमती असणे आवश्यक आहे. चालक हा दहावी उत्तीर्ण तसेच ड्रोन कंट्रोल तंत्रज्ञानाचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
kisan drone yojana प्रश्न आणि उत्तरे
१. कृषी ड्रोन योजना काय आहे?
उत्तर : कृषी ड्रोन अंतर्गत केंद्र सरकार भरतातील शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी ड्रोन वर अनुदान देणार आहे. आपण 50% पासून पाच लाखापर्यंत अनुदान मिळू शकता .
२. कृषी ड्रोन योजनेस शिक्षणाची अट काय आहे?
उत्तर : कृषी ड्रोन योजनेसाठी दहावी उत्तीर्ण असणे व कृषी विभागाकडून रिमोट कंट्रोल यंत्रणेचे अधिकृत सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे .
३. agriculture drone sprayer खरेदीसाठी कोण पात्र आहे ?
उत्तर : एग्रीकल्चर ड्रोन्स स्प्रेयर अनुदान योजनेसाठी भारतातील शेतकरी खरेदीसाठी पात्र आहे.
४.agriculture drone sprayer price in india ?
उत्तर : ड्रोन स्प्रेअरची किंमत ही साधारणपणे त्याच्या पाण्याच्या क्षमतेनुसार 3.5 लाख ते 11.5 लाखांपर्यंत असते. आपण किसान ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज केला तर आपल्याला 50 टक्के अनुदान मिळू शकते.
हे पण वाचा : Fig Farming In India अंजीर शेती लागवड, नियोजन आणि व्यवस्थापन संपूर्ण माहिती.