Vihir Yojana Maharashtra मागेल त्याला विहीर योजना 2023 विहीर बांधण्यासाठी मिळणार चार लाख रुपये अनुदान

Vihir Yojana Maharashtra : महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना महाराष्ट्रात राबवल्या जातात. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास करणे हे या योजनामागचे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असते. महाराष्ट्र शासनाच्या या योजनांपासून बरेच शेतकरी वंचित राहतात. योजनेसाठी पात्र असून पण ते या योजनेचा लाभ घेत नाहीत.अशा प्रकारची एक योजना आहे. या योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींची कामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट्य आहे.

Vihir Yojana Maharashtra
Vihir Yojana Maharashtra

Vihir Yojana Maharashtra अंतर्गत महाराष्ट्रातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार विहीर बांधून देणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी सुमारे ४ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. तर मग आपण शेतकरी मित्र या योजनेचा लाभ कसा घेवू शकतो. याबद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेसाठी अटी काय आहेत?  vihir yojana Maharashtra पात्रता काय आहे? या योजनेसाठी  Online अर्ज कसा करायचा ? या सर्व प्रश्नांची सविस्तर मध्ये माहिती घेणार आहोत. (mahadbt vihir yojana)

Vihir Yojana Maharashtra Highlights

  • योजना : विहीर अनुदान योजना महाराष्ट्र ( मागेल त्याला विहीर योजना)
  • लाभार्थी राज्य : महाराष्ट्र
  • स्थापना विभाग : कृषी विभाग
  • लाभ राशी : 4 लाख रुपये
  • योजनेचा उद्देश्य  : शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, विहिरी साठी आर्थिक मदत करणे. 
  • लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन किंवा ऑफलाईन 
  • अधिकृत वेबसाइट :  महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन

Vihir Yojana Maharashtra उद्दिष्टे 

मागेल त्याला विहीर योजना Purpose

  • विहीर बनण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे. 
  • गरीब व होतकरू शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी प्रोत्साहन देणे. 
  • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. 
  • महाराष्ट्रातील शेतातून मिळणारे उत्पन्न वाढवणे. 
  • दुष्काळात होणाऱ्या पिकांची नुकसान थांबवणे व उत्पन्न वाढवणे. 
  • शेतीला पाणी देण्यासाठी एक सिंचनाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. 
  • शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घेने. 
  • शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक  परिस्थितीमध्ये सुधारणा करता येते.
  • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक जीवनमान सुधारणे.   

Vihir Yojana Maharashtra वैशिष्ट्ये 

मागेल त्याला विहीर योजना Features

  • विहीर अनुदान योजनेमध्ये राज्यातील सर्व जाती धर्मातील, गोरगरीब  शेतकऱ्यांना विहीर बनण्यासाठी अनुदान मिळणार आहे. 
  • या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीची आहे त्यामुळे कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 
  • पैशांची कमतरता असल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे, याला आळा बसण्याचा प्रयत्न या योजनेमार्फत करण्यात येणार आहे. 
  • ग्रामीण भागातील गोरगरीब व पैशाची कमतरता असल्यामुळे विहीर बांधु शकत नाही अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेमुळे विहीर बांधून त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करण्यात मदत मिळणार आहे. 
  • विहीर बांधण्यासाठी अनेक शेतकरी कर्ज काढतात शेतकऱ्यांना कर्ज काढण्यापासून थांबवणे व त्यांना कर्जमुक्त करणे . 
  • या योजनेसाठी पात्र झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ त्यांच्या बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट मिळणार आहे. 
  • महाराष्ट्रातील शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व कुटुंबाचा आर्थिक विकास होऊन ते स्वावलंबी बनतील.(mahadbt vihir yojana)  

Vihir Yojana Maharashtra लाभधारकाची पात्रता 

मागेल त्याला विहीर योजना Beneficiary

  • अनुसूचित जाती व जमातीतील सर्व शेतकरी मित्र. 
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे शेतकरी. 
  •  वार्षिक उत्पन्न कमी असल्यामुळे विहीर बांधू शकत नाही असे गरजू शेतकरी. 
  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेला शेतकरी वर्ग. 
  • अल्पभूधारक शेतकरी. 
  • ज्या शेतकऱ्यांना एक हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. 
  • महिला व पुरुष शेतकरी. 
  • आर्थिक दृष्ट्या विकलांग असणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 
  • अनुसूचित जमाती. 
  • भटक्या जमाती.
  • दारिद्र रेषेखालील शेतकरी वर्ग . 
  • जमीन सुधारणेचे लाभार्थी. 
  • लाभधारकाकडे 0.40 हेक्टर शेती क्षेत्र असावे.

Vihir Yojana Maharashtra लाभ

मागेल त्याला विहीर योजना Benefits

  • ही योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बनण्यासाठी चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
  • आर्थिक दृष्ट्या तर बल व अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
  • शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून वाचणार आहे.
  • ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून शेतीतील उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.
  • चार लाखाची आर्थिक मदत मिळण्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज होणार नाही व शेतकरी आत्महत्या थांबेल.
  •  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
  • उन्हाळ्यात पाण्याचा पाणीपुरवठा योग्य प्रमाणात मिळण्यामुळे शेतकरी दुष्काळात आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवू शकतात.(mahadbt vihir yojana) 
  • शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणार नाही. 

Vihir Yojana Maharashtra Subsidy

मागेल त्याला विहीर योजना Subsidy

मागेल त्याला विहीर  योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. दोन शेतकरी एकत्र येऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Vihir Yojana Maharashtra लाभार्थ्याची निवड 

  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निवड ग्रामसेवक मार्फत केली जाईल. 
  • योजनेचा लाभ देण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांसोबत राहील व योजनेसाठी नाव मंजूर झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत यांत्रिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. 

मागेल त्याला विहीर योजना विहिर कोठे खोदावी ?

  • दोन नद्यांच्या संगमात जिथे जमिनीचा जर पाच मीटर पर्यंत मऊ मातीचा थर असतो म्हणजेच जिथे भिजलेला खडक असतो. 
  • नदी नाल्याजवळील उथळ पाण्याच्या ठिकाणी. 
  • माती कमी असलेल्या प्रदेशात. 
  • ज्या ठिकाणी घनदाट व हिरवी जाडी आहे अशा ठिकाणी. 
  • नदी नाल्यांचा असणारा जुना प्रवाह पात्र ज्यामध्ये दगड गोटे व माती दिसून येतात. 
  • नदी, नाले, ओढे  यांच्या जवळ असणाऱ्या क्षेत्रात. 

मागेल त्याला विहीर योजना विहिर कोठे खोदू नये ?

  • त्या ठिकाणी खडक कठीण असेल अशा ठिकाणी विहीर खोदु नये. 
  • डोंगराचा भाग व त्याच्या जवळच्या 150 मीटरचा प्रदेश. 
  • मातीचा थर ज्या ठिकाणी 30 सेंटिमीटर पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी विहीर खोदू नये. 
  • काही विहिरींचे काम करत असताना खाली कठीण खडक म्हणजेच काळापासून लागतो तर अशा प्रसंगी विहिरीचे काम थांबवण्यात येईल घटनेचा पंचनामा करून काम तेथे थांबवण्यात येईल.(mahadbt vihir yojana)

Vihir Yojana Maharashtra अटी

मागेल त्याला विहीर योजना Terms & Condition

  • शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी अल्पभूधारक हवा.
  • शेतीचे एकूण क्षेत्र अडीच एकरापेक्षा कमी हवे.
  • या योजने अधी महाराष्ट्र विहीर योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नाही पाहिजे.
  • दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी ही योजना आहे.
  • दोन विहिरीमधील अंतर हे 150 मीटर पेक्षा जास्त हवे.
  • शेतकऱ्याने यापूर्वी शेततळ्याच्या योजनेसाठी लाभ घेतलेला असावा.
  • शेतकऱ्याची वार्षिक उत्पन्न कमी असावे.(mahadbt vihir yojana) 
  • सातबारावर या आधी कोणत्याही विहिरीची नोंदणी नसावी. 
  • ज्या ठिकाणी विहिरीचे बांधकाम करायचे आहे ती जागा स्वतःच्या नावावर असावी. 
  • शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • अधिकृत बँकेत खाते व आधार कार्ड असणे गरजेचे आहे. 

vihir yojana online form 

Vihir Yojana Maharashtra ऑनलाईन अर्ज 

  • लाभार्थ्याला सर्वात प्रथम आपल्या गावच्या ग्रामपंचायत जाऊन या योजनेसाठी फॉर्म घ्यायचा आहे किंवा तुम्ही जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सुद्धा फॉर्म घेऊ शकता व या फॉर्म सोबत आवश्यक ती कागदपत्रे वरती दिल्याप्रमाणे जोडायची आहेत. 
  • ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या अर्ज पेटीत हा अर्ज जमा करायचा आहे हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतची आहे त्यासाठी ग्रामपंचायत टाटा एन्ट्री ऑपरेटर ला कामाला लागू शकते. 
  • अशाप्रकारे तुमची विहीर योजनेची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईल. 
  • या योजनेचा लाभार्थी निवडण्यासाठी अधिकारी तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून ज्या ठिकाणी विहीर बांधायचे आहे तेथे येऊन भेट देतील. 
  • लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर पंधरा दिवसात तुम्हाला आर्थिक मदत पुरवण्यात येईल. 
  • अशा पद्धतीने तुम्ही विहिरी योजना महाराष्ट्र साठी पात्र ठराल.(mahadbt vihir yojana) 

Vihir Yojana Maharashtra कागदपत्रे

मागेल त्याला विहीर योजना कागदपत्रे

  • 7/12 चा ऑनलाईन उतारा
  • 8 अ चा ऑनलाईन उतारा
  • जॉब कार्ड ची झेरॉक्स 
  • एकत्र विहीर बांधायची असल्यास 0.40 हेक्टर पेक्षा सलग क्षेत्र असल्याचा पुरावा. 
  • एकत्र विहीर बांधायची असल्यास पाणी वापरण्यासाठी सामोपचाराचे  पत्रआधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

 वरती दिलेली कागदपत्रे तुम्हाला फॉर्म सोबत जोडून सबमिट करायची आहेत. 

Vihir Yojana Maharashtra Question & Answer

मागेल त्याला विहीर योजना प्रश्न आणि उत्तरे 

१. मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत अनुदान मिळते?

उत्तर : मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळते. 

२. मागेल त्याला विहीर योजनेसाठी पात्र कोण आहे?

उत्तर :  या योजनेसाठी अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकरी वर्ग योजनेसाठी पात्र आहे. 

३.  महाराष्ट्र विहीर योजनेअंतर्गत दोघाजणांमध्ये एक विहीर अनुदान मिळाले का?

उत्तर : होय, महाराष्ट्र विहीर योजनेअंतर्गत दोघाजणांमध्ये एक विहीर बांधून मिळेल पण याचा फायदा घेण्यासाठी जमिनीचे क्षेत्र झिरो पॉईंट 40 हेक्टर सलग असावे लागते याचा पुरावा असणे आवश्यक आहे. 

४. मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर : या योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही माध्यमातून करू शकता यासाठी तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन फॉर्म भरून योग्य ते कागदपत्रे त्यासोबत जोडून फॉर्म सबमिट करायचा आहे.

५. महाराष्ट्र विहीर अनुदान कोणत्या राज्यासाठी लागू होणार आहे?

 उत्तर : या अनुदानाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी शेतकरी घेऊ शकतात. 

Leave a Comment