Gai Gotha Anudan Yojana – (पशुपालन योजना महाराष्ट्र) गाय गोठा अनुदान योजना

Gai Gotha Anudan Yojana
Gai Gotha Anudan Yojana

गाय गोठा अनुदान योजना : Gai Gotha Anudan Yojana 2023 मध्ये सरकार शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे.  शेतीसाठी जोडधंदा मधून पशुपालन केले जाते , पण पशुपालन करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी  येतात त्यामुळे शेतकरी शेतीचा जोडधंदा पशुपालन करू शकत नाही म्हणून सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गाईचा गोठा बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळेल तसेच योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्याचे काम सरकार करणार आहे. तरी या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ? आपण या योजनेसाठी पात्र आहोत का ? पशुपालन योजना महाराष्ट्र साठी अटी काय आहेत ? कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ? याची माहिती आपण सविस्तर मध्ये घेणार आहोत. 

बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीमध्ये जास्त उत्पन्न मिळत नसल्यामुळे जोडधंदा म्हणून पशुपालन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त शेतीवर अवलंबून न राहता दुसऱ्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. या योजनेचा लाभ आपण कसा घेऊ शकतो हे आपण आता पाहणार आहोत . (पशुपालन योजना महाराष्ट्र )

गाय गोठा अनुदान योजनेचा उद्देश 

 • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करणे. 
 • शेतीसोबतच त्यांना अजून एक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे. 
 • शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे. 
 • पशुपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. 
 • शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. 
 • दूध व्यवसायात वाढ करणे. 
 • देशातील दुधाचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा हेतू आहे. 

गाय गोठा अनुदान योजना Highlights

 • योजना : गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र (पशुपालन योजना महाराष्ट्र )
 • योजनेची सुरुवात दिनांक : ३ फेब्रुवारी २०२१  
 • विभाग : कृषी विभाग
 • स्थापना : महाराष्ट्र शासन (पशुपालन योजना महाराष्ट्र )
 • लाभार्थी : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी
 • फायदा : गोठा बांधण्यासाठी अनुदान
 • उद्देश : शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा उपलब्ध करून देणे
 • अर्ज पद्धती : ऑनलाईन , ऑफलाईन.

गाय गोठा अनुदान योजना पात्रता

 • लाभार्थी महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे. 
 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळेल. 
 • सरकारकडून उपलब्ध असलेल्या पशुपालन योजना महाराष्ट्र मध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही . 
 • या योजनेचा लाभ फक्त शेतकरीच घेऊ शकतात . 
 • एका कुटुंबातील एकच शेतकरी या योजने अंतर्गत गोठा बांधू शकतो.(पशुपालन योजना महाराष्ट्र)

Gai Gotha Anudan Yojana वैशिष्टये

 • गाय गोठा योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे . 
 • गाय गोठा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळेते. 
 • यामुळे पशुपालनामध्ये लोकांची आवड निर्माण होईल . 
 • ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने देखील ओळखली जाते . 
 • शेतीबरोबर आणखी एक जोडधंदा निर्माण करून देणे . 
 • पशुपालनाला आर्थिक मदत मिळवून देणे . 
 • महाराष्ट्रातील दुधाचे उत्पन्न वाढवणे . 
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे . 

गाय गोठा अनुदान योजना लाभ

 • या योजनेअंतर्गत पशुपालनासाठी गोठा बांधून मिळतो. 
 • कुकुट पालनासाठी शेडची व्यवस्था करून मिळेते. 
 • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत पुरुष आणि महिला शेतकरी हे दोघे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 
 • गोठा बांधण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाहीत. 
 • जनावरांचे ऊन , वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण केले जाईल . 
 • शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल . 
 • उत्पन्नासाठी फक्त शेतीवर अवलंबून राहणे बंद होईल . 
 • महाराष्ट्रातील दूध उत्पादनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत मिळेल. (पशुपालन योजना महाराष्ट्र)

Gai Gotha Anudan Yojana Online Registration

 • गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खाली दिलेल्या पीडीएफ वर क्लिक करून तो फॉर्म भरायचा आहे. 
 • फॉर्ममध्ये दिलेली योग्य ती माहिती भरल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे फॉर्मला जोडायचे आहेत. 
 • संपूर्ण भरलेला फॉर्म आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन जमा करायचा आहे. 
 • हा फॉर्म जमा केल्यानंतर आपल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. 
 • संपूर्ण खात्री पटल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल. 
 • अशाप्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि शेतीला जोडधंदा सुरू करून आपले उत्पन्न वाढू शकतात.(पशुपालन योजना महाराष्ट्र) 

Gai Gotha Anudan Yojana कागदपत्रे 

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • उत्पन्नाचा दाखला
 • मतदान कार्ड
 • मोबाईल नंबर 
 • वास्तव्याचा दाखला 
 • आदिवासी प्रमाणपत्र
 • जन्माचे प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र
 • घोषणापत्र 
 • ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत शेतकऱ्यांची सह-हिस्सेदार
 • ग्रामपंचायत शिफारस अर्ज 
 • अल्पभूधारक प्रमाणपत्र 
 • जनावरांसाठी गोठा बांधायचे अंदाजपत्रक.

पशुपालन योजना महाराष्ट्र कागदपत्रे वरील दिल्याप्रमाणे. 

gai gotha anudan yojana  प्रश्न आणि उत्तरे 

१. gai gotha anudan yojana अंतर्गत गोठा बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाते?

उत्तर : 

 • २ ते ६ गुरांसाठी – ७७१८८/- रुपये. 
 • १२ गुरांसाठी – दुप्पट अनुदान. 
 • १८ गुरांसाठी – तिप्पट अनुदान. 

२. गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्र कोण आहे?

उत्तर : लाभार्थी महाराष्ट्राचा व शेतकरी असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. 

३. गाय गोठा कसा असावा ?

उत्तर : गोठा बांधण्याची पद्धत : गोठा हा  ढाळ (उतरत्या) असलेल्या बाजूस असावा जेणेकरून जनावरांचे मलमूत्र वाहून जाईल. गोठ्याची जागा ही कठीण आणि सपाट असावी.  

४. gai gotha anudan yojana near Pune, Maharashtra ?

उत्तर : गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे आपण आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता. (पशुपालन योजना महाराष्ट्र)

Leave a Comment