Monsoon Today : मान्सूनसाठी तयार झालेल्या अनुकूल अशा वातावरणामुळे आता तरी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होईल अशी अपेक्षा पुण्यातील नागरिकांची आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरीही पाऊस पुण्यात दडी मारून बसलेला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील त्यामुळे हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. याच वेळी घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडू शकतो.
पुणे Monsoon Today :
दोन दिवस पुण्यामध्ये ढगाळ वातावरण होते. तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक असा पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे.
मध्य महाराष्ट्रआणि कोल्हापूरसह विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी चालू आहेत. दोन दिवसात रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावली आहे.
हे पण वाचा : Rain Updates पुढील तीन दिवसात होणार पावसाचा कमबॅक, महाराष्ट्रातील उरलेल्या सर्व भागात पडणार पाऊस