Rain Update : मुसळधार पावसाने दिल्लीला आला पुर आता महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो का ? काय म्हणते हवामान खाते

Rain Update : मुसळधार पावसाने दिल्लीला आला पुर आता महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो का ? काय म्हणते हवामान खाते
Rain Update : मुसळधार पावसाने दिल्लीला आला पुर आता महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो का ? काय म्हणते हवामान खाते

Rain Update : हवामान खात्याने काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. उत्तरखंड पासून ते उत्तर प्रदेश पर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.

गेल्या काही दिवसात दिल्ली पावसाने झोडपून काढलेली आहे. दिल्लीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. सर्वसामान्य लोक घरात बसून आहेत. रस्त्यांवर आणि संपूर्ण शहरात पाणी साचलेले आहे, त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वीस राज्यांसाठी अलर्ट जारी केलेला आहे. येत्या काही दिवसात उत्तर प्रदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. दिल्लीमध्ये असणाऱ्या यमुना नदीला पूर आलेला आहे. पुराचे पाणी आता रस्त्यावर आलेले आहे. जवळपासच्या भागांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे.

येत्या काही तासात उत्तर प्रदेश मध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. हा हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे.

Rain Update Maharashtra : त्याचबरोबर 20 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ येथे मोठ्या प्रमाणात येत्या 24 तासात पाऊस पडू शकतो. तसेच महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस होणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे.

या दिलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये मध्यम आणि तुरळक प्रमाणात पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा : Monsoon Today दोन ते तीन दिवसात राज्यात पडणार मुसळधार पाऊस पुणे मात्र पावसाची वाट पाहताना

Leave a Comment